24 C
Mumbai
Tuesday, January 27, 2026
घरसंपादकीयमहायुतीच्या मंत्र्याची पॅण्ट उतरवण्याची अस्लमची धमकी; पोलिस तक्रार करूनही कारवाई नाही

महायुतीच्या मंत्र्याची पॅण्ट उतरवण्याची अस्लमची धमकी; पोलिस तक्रार करूनही कारवाई नाही

कुदळवाडी प्रमाणे मालवणी साफ होईल असे आम्हाला वाटत होते

Google News Follow

Related

देशातील १२ राज्यात सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन या निवडणूक आयोगाच्या उपक्रमामुळे देशात बेकायदेशीरपणे घुसून बसलेले बांगलादेशी, रोहिंगे पळ काढतायत. परंतु मुंबईतील मालवणीत काँग्रेसचा आमदार स्लम शेख या कारवाईसाठी पुढाकार घेणाऱे महायुतीचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना धमकी देतो, बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्या तोडण्याच्या मोहिमेत खोडा घालतो. स्लम शेखच्या विरोधात मुंबईच्या पोलिस आय़ुक्तांकडे तक्रार केल्यानंतरही त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई होत नाही. हा स्लम शेख महायुती सरकारपेक्षाही मोठा आहे का, असा प्रश्न आता स्थानिकांना पडलेला आहे.

मालवणीतील सरकारी जमिनीवर कब्जा करून तिथे बांगलादेशींच्या वस्त्या निर्माण करण्याचे काम गेली दहा वर्षे सुरू आहे. भाजपाचे स्थानिक नेते तिथे लढत होते, परंतु यश मिळत नव्हते. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यात पुढाकार घेतला. सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे सरकारी तंत्र हलले आणि सुमारे नऊ हजार चौरस मीटरचा भूखंड साफ करण्यात आला. इथल्या झोपड्या आणि कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. परंतु अचानक ही कारवाई थांबली. पालिकेचे अधिकारी अचानक शांत झाले. ज्या भूखंडावर झोपड्या तोडण्यात आल्या तिथे पुन्हा झोपड्या वसवण्याचे काम सुरू झाले.

स्लम शेखने मालवणीत एक जाहीर सभा घेतली. तिथे गरीबांच्या झोपड्या पाडल्या जात असल्याचा कांगावा करत ठणाणा केला. याच सभेत तो मंगलप्रभात लोढा यांच्याबद्दल वाट्टेल ते बोलता. लोढा यांची पॅण्ट कमरेखाली सरकेल, अशी भाषेत त्यांचा पाणउतारा केला. त्यांच्या परीवारावरही तो घसरला.

खरे तर एक लोकप्रतिनिधी म्हणून सरकारी जमीनी बळकावण्याच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईचे अस्लम शेख याने समर्थन केले पाहीजे होते. परंतु बांगलादेशींच्या अनधिकृत वस्त्या उभ्या करून आपला मतदार वाढवणे, मालवणीची डेमोग्रॅफी बदलून हिंदूंना इथून पलायन करायला भाग पाडणे हेच षडयंत्र असल्यामुळे तो बांगलादेशींच्या पाठिशी ठामपणे उभा राहणे स्वाभाविक आहे.

लोढांपर्यंत हा विषय पोहोचल्यानंतर. त्यांनी या प्रकरणी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे लिखित अर्ज दिला. त्यात त्यांनी स्पष्टपणे आरोप केलेला आहे, की मला आणि माझ्या परीवाराला अस्लम शेख याने धमकावले. काय परीस्थिती आली आहे पाहा, सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला, महायुती सरकारच्या मंत्र्याला असे खुलेआम धमकावण्यात आले. त्याच्याविरोधात हा मंत्री पोलिस आय़ुक्तांकडे तक्रार करतो, परंतु २४ तास उलटून गेल्यानंतरही अस्लम शेखच्या विरोधात साधा गुन्हा दाखल केला जात नाही. महायुतीच्या एका मंत्र्यासमोर एक काँग्रेसचा आमदार भारी ठरतो.

हा अस्लम शेख असा कोण तीस मार खान लागून गेला आहे, जो मालवणीतील तिवरांची कत्तल करून इथे बेकायदा स्टुडीयो ठोकतो, आलिशान बंगला बांधतो, त्याच्या विरोधात किरीट सोमय्या यांच्यासारखा बुजुर्ग नेता आवाज उठवतो, परंतु त्याच्या बंगल्याला हात लागत नाही. त्याच्या स्टुडीयोच्या विरोधातही अर्धवट कारवाई करून विषयावर पडदा टाकला जातो. मालवणीत बांगलादेशींच्या झोपड्यांवर हतोडा पडत असताना हा अस्लम शेख पुन्हा आडवा येतो, महायुतीच्या मंत्र्यांना धमकावतो. तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही.

न्यूज डंकाच्या प्रतिनिधीने वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे याबाबत विचारणा केली. चौकशी सुरू आहे, असे उत्तर मिळाले. लोढा यांनी दाखल केलेली तक्रार अत्यंत गंभीर आहे. पुराव्या दाखल त्यांनी एक व्हिडीयो सुद्धा सादर केलेला आहे. परंतु पोलिस अजून चौकशी करतायत. पोलिसांनी साधी एनसी सुद्धा दाखल केलेली नाही. एफआयआरचा विषय फारच दूर राहीला.

मुंबईत बांगलादेशींच्या वस्त्या उभ्या राहतात. एक नेता प्रामाणिकपणे या वस्त्या उखडून टाकण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु विरोधी बाकावरचा एक साधा आमदार त्याला भारी पडतो. अस्लम शेखचा ऑरा काही औरच आहे. याला भाजपामध्ये आणण्याचेही प्रय़त्न झाले. प्रवेश जवळ जवळ पक्का झाला होता. भाजपामधला एक नेता, त्याला हवे तर तुम्ही बेताज बादशहा म्हणू शकता कारण कोणतेही पद नसताना तो एखाद्या मंत्र्यापेक्षा जास्त प्रभावी आहे. तर हा नेता अस्लमला भाजपामध्ये आणण्यासाठी प्रचंड उत्सुक होता. बहुधा अस्लमने ज्या झोपडपट्ट्या थाटल्या त्यावर भविष्यात एखादी झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्याचा त्या नेत्याचा विचार असावा. म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता असताना आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख याचे जसे साथी हात मिलाना, एक अकेला थक जाये तो मिल कर हाथ बढना… असे युगुल गीत गात होते, तेच महायुती सरकारच्या काळात करण्याचा बहुधा विचार होता.

हे ही वाचा:

आयटीबीपीचा ६४ वा स्थापना दिवस उत्साहात

व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धा २५ नोव्हेंबरपासून

काँग्रेसचा यू टर्न! ‘मारहाण’ करणाऱ्या पक्षांसोबत जुळवून घेण्याचे संकेत

कोचमध्ये शिजवले नूडल्स, रेल्वे प्रशासनाच्या संतापाला उकळी

परंतु ऐनवेळी हालचाल झाली. संघाचे लोक सक्रीय झाले. विषय देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला म्हणून हा प्रकार थांबला. अस्लम भाजपावासी व्हायचा राहून गेला. हिंदुत्वाशी उघड पंगा असलेल्या अशा लोकांना भाजपाचा टीळा लावण्यासाठी काही लोक इतके उतावीळ का असतात? कि भाजपामध्ये अस्लम सारख्या उपऱ्यांची संख्या वाढावी म्हणून काही लोक जाणीवपूर्वक ताकद लावतायत ? पालघरमध्येही साधू हत्याकांडातील एका आरोपीला कमळावर बसवण्याचा प्रयत्न झाला. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असल्यामुळे कारवाईपासून वाचलेला खरा आरोपी पक्षात येता येता राहीला. मग युटर्न घेत त्याचा प्रवेश रोखण्यात आला. यूटर्नची परंपरा उद्धव ठाकरेंची आहे. ती तिथेच राहू दे, भाजपामध्ये ती सुरू व्हायला नको.

अस्लम शेखवर भाजपामधल्या कोणाचे प्रेम असले तर असू दे, त्याला पाहून कोणी डोळा मारत असेल तर तेही असू दे, हे विवाहबाह्य संबंध ज्याला जपायचे आहेत, त्याला जपू दे, परंतु सरकारच्या एका मंत्र्याची हा अस्लम जाहीरपणे पॅण्ट उतरवत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला नको?

मालवणीतील तोडकाम कोणामुळे थांबले याचा शोध घेणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. मालवणीत झोपड्यांनी अतिक्रमित जागा लाख चौरस मीटरपेक्षा जास्त आहे. त्यातली दहा टक्के जागा फक्त साफ झाली आहे. त्यावरही झोपड्या ठोकण्याचे काम सुरू झालेले आहे. पुण्यातील कुदळवाडी प्रमाणे मालवणी साफ होईल असे आम्हाला वाटत होते. तिथेही हा अस्लम आडवा आला. पालिका आणि पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा त्याला आहेच. हे सगळे मोडून काढण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक जनादेश देणाऱ्या भाजपाच्या मतदारांना आणि समर्थकांना त्रासदायक वाटणाऱ्या आणि हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारला न शोभणाऱ्या या घटना आहेत. उत्तर प्रदेशात जेव्हा योगी आदित्यनाथ यांचा बुलडोजर चालतो तेव्हा आम्ही टाळ्या वाजवतो. महाराष्ट्रात रोज बुलडोजर चालवावा लागेल अशी परिस्थिती आहे. आमचा बुलडोजर क्वचित कधी तरी गॅरेजमधून बाहेर पडतो. त्यामुळेच अस्लम सारख्यांना धमक्या देण्याची हिंमत होते. मालवणी जेव्हा कारवाई सुरू झाली तेव्हा आम्ही देवाभाऊंचे जाहीर अभिनंदन केले होते. आम्हाला वाटले होते की कुदळवाडी प्रमाणे मालवणीही साफ होईल. दुर्दैवाने ते घडले नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा