31 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरसंपादकीयहे सोपे नव्हते, कारण आधी धूर निघाला होता, आता गॅस सापडलाय...

हे सोपे नव्हते, कारण आधी धूर निघाला होता, आता गॅस सापडलाय…

मोदींनी अंदमान निकोबारच्या केलेल्या साहसाल सलाम केलाच पाहिजे

Google News Follow

Related

अंदमानच्या समुद्रात गॅसचे भांडार सापडल्याची घोषणा आपले पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी केलेली आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळेल, न मिळेल. परंतु त्यांच्या धाडसाचे मात्र कौतूक झाले पाहीजे. कारण काही वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या अशाच एका प्रयत्नांची माती झाली होती. निष्कलंक प्रतिमा असलेल्या मोदींवर या निमित्ताने भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडवण्याची संधी काँग्रेसला मिळाली होती. ते आरोप बिनबुडाचे असले तरी त्यावेळी झालेली बदनामी मोदी विसरलेले नसतील. तरीही त्यांनी अंदमानमध्ये तेल आणि गॅसच्या संशोधनासाठी प्रचंड पैसा ओतला. यावेळी त्यांच्या हाती यश आलेले आहे.

देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी उर्जा सुरक्षेला पर्याय नाही. ही अशी नाजूक नस आहे, जी दाबून तुम्हाला गुडघ्यावर आणणे महासत्तांना सहज शक्य असते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या समस्येवर इलाज शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांचे लक्ष गेले अंदमान निकोबार बेटांवर. देशाची सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टी मजबूत करण्यासाठी या बेटांची महत्वाची भूमिका असू शकते, हे त्यांच्या लक्षात आले.

बंगालच्या उपसागरापासून इंडोनेशिया या पट्ट्यात मुबकल तेलाचे साठे असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज होताच. जर ते म्यानमार आणि इंडोनेशियात सापडले असेल तर ते अंदमानमध्येही निश्चितपणे असायला हवे होते. परंतु इथे फक्त अंदाज बांधणे पुरेसे नव्हते. इथे खोऱ्याने पैसा ओतण्याची गरज होते. सरकाने डीप सी मिशन अंतर्गत इथे संशोधन करण्याचे निश्चित केले. हे तंत्र अत्यंत महागडे आहे. मूठभर विकसित देशांकडे हे तंत्र आहे. सरकारकडे पैसा होता, तंत्रज्ञानही होते. परंतु मोदींच्या डोक्यावर इतिहासाचे असे एक ओझे होते जे झुगारणे कठीण होते. अंदमानमध्ये तेल आणि गॅसचे घबाड आहे, असे दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी जाहीर केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली. मोदींनी इतिहासाचे ते ओझे झुगारुन टाकले आहे.

हे ही वाचा:

२१ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

अतिवृष्टीग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून १० कोटींची मदत जाहीर!

भारत आमचा बाप होता आणि नेहमीच राहील…

भारत ते भूतान रेल्वे प्रवास लवकरच! ४,०३३ कोटी रुपयांची गुंतवणूक

गोष्ट आहे, २००५ मधील. मोदी गुजरातचे मुख्यमंत्र होते. गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशही राज्य सरकारची कंपनी. कृष्णा-गोदावरी बेसिनमध्ये २० ट्रिलिअम क्युबिक फूट गॅसचे साठे असल्याचा दावा केला. या गॅसचे साठे शोधण्याची सुरूवात झाली. हा प्रयत्न अपयशी ठरला. काँग्रेसने या मुद्द्यावर मोदींना घेरण्याचा प्रय़त्न केला. संयुक्त संसदीय समिती किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी काँग्रेसने केली. या गॅस उत्खननासाठी बँका आणि अन्य माध्यमातून सुमारे २० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. २००६ ते २०१५ या काळात १०६५१ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अजय कुमार यांनी केला होता. मोदींच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने ते पंतप्रधान झाल्यानंतर केला.

असे म्हणतात की दूधाने तोंड पोळलेला ताकही फूंकून पितो. मोदी मात्र मुख्यमंत्री पदाच्या काळातील त्या अपयशाने खचले नाहीत. त्यांनी अंदमान निकोबारमध्ये नव्या दमाने प्रयत्न सुरू केले. कारण त्यांना माहिती होते. तेल आणि गॅस असो, खनिजे असो वा कोणत्याही प्रकारचे संशोधन, त्यासाठी अमाप पैसा खर्च करावा लागतो. प्रख्यात शास्त्रज्ञ थॉमस एडीसनने म्हणजे शेकडो प्रयत्न फसल्यानंतर हजाराव्या प्रयत्नांत बल्बचा शोध लावला. ते म्हणायचे मी १० हजार वेळा अपयशी ठरलो नाही. मी अशा १० हजार पद्धीतींचा शोध लावला ज्या बल्ब बनवण्यासाठी उपयुक्त नसतात.

जे अपयशाने थांबणाऱ्यांना यश कधीच हात देत नाही. मोदींना ते माहीती असल्यामुळे त्यांनी तेलाच्या संशोधनासाठी पैसा खर्च केला नाही तर अक्षरश: ओतला. त्याची फळे आज दिसू लागली आहेत.

अंदमानमधील श्री विजयपूरम-२ या विहीरीत नैसर्गिक वायू सापडला आहे. अंदमान निकोबार द्वीप समुहापासून ही विहीर १७ कि.मी. अंतरावर असून सुमद्र पातळीपासून २९५ मीटर अमतरावर ही विहीर सुरू होते. तिथून पुढे विहीरीची खोली २३५५ मीटर  आहे. या विहीरीत नैसर्गिक वायू असल्याचे स्पष्ट झाले असून त्यात मिथेनचे प्रमाण ८७ टक्के आहे. लवकरच याचे उत्पादन सुरू होईल.

जो देश ८५ टक्के तेल आणि गॅसच्या गरजा आयात करून भागवतो, त्यासाठी ऊर्जा स्त्रोतांचे महत्व किती आहे, हे लक्षात घ्या. २०२४ या आर्थिक वर्षात आपण सुमारे १७७ अब्ज डॉलरचे पेट्रोलियम पदार्थ आयात केले. दक्षिण अमेरिकेतील भुके कंगाल देश असलेल्या गयानाचे भाग्य तेलाचे साठे सापडल्यानंतर बदलले. अनेक दशकांपूर्वी आखाती देशांबाबत हेच झाले होते. अंदमान निकोबारमध्ये अनेक गयाना आहेत, असे विधान हरदीप सिंह पुरी यांनी दोन महिन्यांपूर्वी केले होते. ते हवेत केलेले गोळीबार नाहीत, हे श्री विजयपूरम-२ मध्ये गॅस सापडल्यानंतर सिद्ध झाले आहे. आपल्या देशाचे अर्थकारण २० ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे सामर्थ्य अंदमान निकोबारमधील तेल-गॅसच्या साठ्यांमध्ये आहे, असेही ते म्हणाले होते. हे २० ट्रिलियन तुर्तास बाजूला ठेला. येत्या १० वर्षात अंदमान निकोबार मधील तेलामुळे आपण जर आपले पेट्रोलियम आयातीचे बिल २५ टक्क्यांनीही कमी करू शकलो, तरी किती पैसा वाचेल याची कल्पना करा. ही देशाची गरुड भरारी ठरले.

देशात मोदी एकाच वेळी देशात तेल-गॅस शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. मोठ्या प्रमाणात रस्ते, पूल, टनेल निर्माण करतायत. लष्करी सज्जतेसाठी प्रचंड पैसा खर्च करतायत. डीआरडीओ, इस्त्रो सारख्या संशोधन संस्थांना काहीही कमी पडू देत नाहीत. एवढे सगळे करताना देशात महागाईचा दर ४ ते ६ टक्क्यांपेक्षा वाढू देत नाही.

भारताचे एक वैशिष्ट्य आहे. भारत नेहमी आपल्या क्षमतांबाबत फार हातचे राखून सांगत असतो. दहा असेल तर पाच सांगेल. आज काम पूर्ण झाले असेल तर ते महिन्याभराने होईल असे सांगेल. मूठ झाकली ठेवणे हे भारताचे धोरण आहे. अंदमानबाबतही भारताकडून जे काही जाहीर केले जाते आहे, ते परीपूर्ण असेल असे मानण्याचे काही कारण नाही. त्यामुळे जे काही केंद्र सरकारने जाहीर केले आहे, ते सुखावणारे आहे.

पुन्हा वळूया त्या अपयशाकडे जे मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सोसले. कृष्णा-गोदावरीच्या बेसिनमध्ये गॅस शोधण्यासाठी केलेला खर्च या नद्यांच्या पाणीत वाहून गेला. हाती काहीही लागले नाही. लागला तो फक्त अपयशाचा बट्टा. यशाची सवय झालेल्या नेत्याला असे एखादे मोठे अपयश येते तेव्हा त्याची जखम खोलवर होते. आता ती जखम सुकली असली तरी तिचे व्रण मात्र कायम असतील. म्हणूनच मोदींनी अंदमान निकोबारचे जे साहस केले आहे, त्याला सलाम केलाच पाहीजे. ही सुरुवात आहे, हे मानायला वाव आहे. अशा बऱ्याच सुवार्ता यापुढेही येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. श्री विजयपूरम-२ मध्ये सापडलेला गॅस हा विकसित भारताच्या संकल्पासाठी अंदमानच्या समुद्रात मिळालेला हा सगळ्यात मोठा शुभसंकेत होय.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा