24 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरसंपादकीयकाँग्रेसमध्ये इतकी अस्वस्थता का?

काँग्रेसमध्ये इतकी अस्वस्थता का?

काँग्रेसचे राजकारण रसातळाकडे चालले आहे.

Google News Follow

Related

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात अवघा देश एकवटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचे सुतोवाच केलेले आहे. तो शिकवला जाईल
याबाबत सर्वसामान्यांच्या मनात कोणताही संशय नाही. पाकिस्तानचा कणा मोडण्यासाठी भारत पहिले पाऊल टाकणार तो मुहूर्त कोणता, एवढाच प्रश्न शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कवडीदमडीचे नेते पाकिस्तानला सोडून मोदींना टार्गेट करताना दिसतायत. मूर्ख विधाने करून तोंड काळे करून घेण्याचा प्रताप विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या वाचाळ प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केलेला आहे. सवाल हा आहे की यांचा बोलविता धनी कोण? काँग्रेसमधील ही
अस्वस्थता काय सांगते आहे?

पाकिस्तानची खोड मोडण्यासाठी केंद्र सरकारने बैठकांचा सिलसिला सुरू केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरीटीच्या दोन बैठका झाल्या. या बैठकांमध्ये तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख,
चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपस्थित होते. त्यापूर्वी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत संरक्षण मंत्री राजनाथ यांची बैठक झाली. अंतर्गत सुरक्षेबाबत गृहमंत्री अमित शहा अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षा दलांच्या प्रमुखांसोबत बैठका घेत आहेत. परंतु काँग्रेसला मात्र मोदी गायब असल्याचे भास होत आहेत. मोदी गर्जनेनंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर बंकरमध्ये जाऊन लपल्याची पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा आहे. जे सत्यही आहे. तशीच चर्चा मोदींबाबत व्हावी अशी सुरूसुरी काँग्रेसला आलेली दिसते. पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक बिन शिराच्या व्यक्तिचे चित्र टाकून जिम्मेदारी के समय गायब अशी पोस्ट केली होती. लक्ष्य अर्थातच मोदी होते. हे सत्य नसल्यामुळे या पोस्टचे बुमरॅंग झाले. काँग्रेसला लोकांचा संताप झेलावा लागला.

सोमवारी ही पोस्ट करण्यात आली. देशात संतापाची राळ उठली. हा संताप फक्त भाजपा नेत्यांमध्ये नव्हता, माध्यमांमध्ये, जनतेमध्ये या पोस्टवरून भडका झाला. कारण देशाची जनता मोदींच्या सोबत आहे. चुक लक्षात आल्यानंतर ही पोस्ट गायब अर्थात डिलीट करण्यात आली. अर्थात बुंद से गयी वो हौदसे नही आती. मोदी सत्तेत आल्यापासून देशात बॉम्बस्फोटांचे सत्र थांबले. काश्मीर तुलनेने शांत झाले. देशावर डोळे वटारणारा पाकिस्तान सरपटू लागला. काँग्रेसच्या सत्ता
काळात जे पाहाण्यासाठी देशाची जनता आसूसली होती, ते देशात प्रत्यक्षात घडत होते. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाले, पुलवामानंतर बालाकोट झाले. हे अभूतपूर्व होते, दहशतवादी हल्ल्यानंतर हे असे कधी घडले नव्हते. हेच
काँग्रेसच्या अस्वस्थेचे कारण आहे. हीच काँग्रेसची खदखद आहे जी त्यांना लपवता येत नाही. लोक काँग्रेसचा सत्ता काळ आणि भाजपाचा सत्ताकाळ यात तुलना करतायत. मोदींचे कौतुक करतायत.

हे ही वाचा:

पहलगाम हल्ल्यानंतर दुःखी झालेली नेहा खान बनली नेहा शर्मा

माजी रॉ प्रमुख आलोक जोशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख

मोठा निर्णय : राष्ट्रीय जनगणनेत होणार जातीय नोंदणी

‘तारीख पे तारीख…’ चित्रपट झाला ३२ वर्षांचा !

केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. केंद्र सरकार जी काही कारवाई करेल त्याला त्यांना पाठिंबा व्यक्त केला होता. परंतुहा पाठिंबा मनापासून होता
का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण या पाठिंब्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘धर्म विचारण्या इतपत दहशतवाद्यांना वेळ असतो का’, असे विधान करून अकलेचे तारे तोडले, त्यानंतर माफी मागितली. हा वाद शमतो न शमतो तोच एक्सवर ही नवी पोस्ट आली. काँग्रेसचा बेशरमपणा थांबण्याचे नाव नाही.
देशाची सूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती आल्यानंतर परराष्ट्र धोरणात आमुलाग्र बदल झाला. कधी काळी अशी परिस्थिती होती ती पाकिस्तानने सतत भारत विरोधी कारवाया कराव्यात आणि भारताने कडी निंदा करावी. कागदी घोडे
नाचवावेत. देशाच्या इतिहासातील सगळ्यात भीषण दहशतवादी हल्ला म्हणून मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्याचा उल्लेख होतो. त्यावेळी एअर चीफ मार्शल फली होमी मेजर यांनी सरकारला सांगितले होते की. आम्ही आक्रमणासाठी सज्ज आहोत. परंतु पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला नाही. तो का देण्यात आला नाही, याचा खुलासा अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अ प्रॉमिस्ड लँड या आत्मचरित्रात आहे.

मनमोहन यांना भाजपाला याचा राजकीय फायदा मिळेल याची चिंता होती. पाकिस्तान इतका शेफारला होता की तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हे मनमोहन यांचा उल्लेख देहाती औरत असा करत. आज मोदींच्या नावाने पाकिस्तान चळाचळा कापतो आहे. पहलगाम हल्ल्यानंतर बिहारच्या भूमीवरून मोदींनी जी गर्जना केली, तेव्हा पासून पाकिस्तानी नेत्यांची पॅण्ट पाठून पिवळी झाली आहे. भारत कधीही हल्ला करू शकेल, अशी भीती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आफीस यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. भारताकडून होणारा हा संभावित हल्ला टळावा म्हणून पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आम्ही हल्ल्याच्या चौकशीसाठी तयार आहोत, असे विधान केले. एखाद्या देशावर जेव्हा आक्रमण होण्याची शक्यता असते, तेव्हा जनता आक्रमक देशाच्या विरोधात, या देशाच्या नेत्याच्या विरोधात एकवटते. पाकिस्तानमध्ये उलटे चित्र आहे. सिंधमध्ये पाक सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. बलोच नेते भारताच्या आक्रमणाची वाट पाहत आहेत.

तीच परिस्थिती खैबर पख्तूनख्वामध्ये आहे. सगळे जग पाकिस्तानची अवस्था पाहते आहे. चीन आणि काही प्रमाणात तुर्कीये हे पाकिस्तानच्या बाजूने आहेत, परंतु उघडपणे काही करण्याची त्यांचीही हिंमत नाही. हेच काँग्रेसला खलते आहे. जी भीती मनमोहन यांना होती, तीच भीती आज राहुल गांधी यांना वाटत असण्याची दाट शक्यता आहे. अन्यथा देश संकटात असताना अशा प्रकारची विधाने करणाऱ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी झाली असती. देश स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तानसोबत भारताने चार युद्ध लढली. त्यात काँग्रेसच्या सत्ताकाळात तीन युद्ध झाली. तेव्हा विरोधी बाकावर असलेल्या जनसंघाने, भाजपाने वयम् पंचाधिका शतम् अशीच भूमिका घेतली. देशाचा विजय झाला तर काँग्रेसला किती राजकीय लाभ मिळेल याचा कधीही विचार केला नाही. हा राष्ट्रीय दृष्टीकोन काँग्रेसने आता दाखवावा अशी अपेक्षा असताना काँग्रेसचे नेते अकलेचे तारे तोडतायत.

आज राहुल गांधी यांनी डोकलाम संघर्षाच्या काळात जी चुक केली होती, त्याची पुनरावृत्ती केली तर लोक काँग्रेसची कबरच खणतील. सीमेवर भारतील सैनिक चीनला भिडत असताना राहुल गांधी चीनी राजदूतासोबत रात्री गपचुप जेवण करून आले होते. तसा प्रकार खपवून घेण्याची भारतीयांची यत्किंचितही मानसिकता नाही. त्यामुळे जे राहुल गांधी यांना करणे शक्य नाही ते सुप्रिया श्रीनेत, वडेट्टीवार यांच्यासारख्या छुटूरपुटूर नेत्यांमार्फत सुरू आहे की काय असा संशय येतो. काँग्रेसचे राजकारण रसातळाकडे चालले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा