31 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरसंपादकीयआव्हाडांनी तेलगी प्रकरणातील अदृश्य हात उघड केला; नंतर पोस्ट डीलीट केली

आव्हाडांनी तेलगी प्रकरणातील अदृश्य हात उघड केला; नंतर पोस्ट डीलीट केली

आव्हाडांचा ईशारा कोणाच्या अदृश्य हाताकडे होता हे उघड गुपित आहे.

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री यांनी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे नेते शरद पवार यांचा गेम केला. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. आव्हाडांच्या तल्लख बुद्धीमुळे दोन दशकांपूर्वी झालेल्या बनावट स्टँप पेपर घोटाळ्याच्या प्रकरणात शरद पवार यांनी गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता ही बाब आता स्पष्ट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांचा पक्ष त्यांचे पुतणे अजित पवार यांनी हायजॅक केला आहे. निदान वरकरणी तरी दोन्ही नेते तसे भासवण्याचा प्रय़त्न करीत आहेत. या पक्ष फुटीच्या नाट्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर वार होत असताना आव्हाडांनी शरद पवारांची अब्रुच चव्हाट्यावर आणली आहे.  

बनावट स्टँप पेपर घोटाळा हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकारच्या काळात उघड झाला. स्टँप पेपर छापण्याच्या छापखान्यातून जुनाट छपाई मशीन विकत घेऊन तेलगीने हा धंदा सुरू केला. कोट्यवधी रुपयांची कमाई केली. २००० च्या पहिल्या दशकातील हा देशातील सर्वात मोठा महाघोटाळा होता. सुमारे २० हजार कोटींचा घोटाळा. तेलगीकडे इतका पैसा आला होता की, २००० सालच्या ३१ डिसेंबरच्या रात्री दक्षिण मुंबईच्या टोपाझ डान्सबारमध्ये तेलगीने सुमारे एक कोटी रुपये तरन्नुम खान या बारबालेवर उधळले होते. हा आकडा फक्त एका रात्रीचा आहे. कल्पना करा तेलगीकडे किती पैसा असेल. त्याच्या राजकीय गॉडफादरकडे किती पैसा असेल. या घोटाळ्यात न्यायालयाने तेलगीला ठोठावलेल्या दंडाचा आकडा २०३ कोटी रुपये इतका प्रचंड आहे. या घोटाळ्यात तेव्हा तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचे नाव आले होते. त्यावेळी राज्य सरकारचे सूत्रधार असलेल्या शरद पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला.  

याच मुद्दावरून बीडमध्ये झालेल्या अजित पवार गटाच्या उत्तर सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केली. आपण हा घोटाळा उघड केला असताना शरद पवार यांनी आपला राजीनामा घेऊन आपला गेम केला, अशी कैफियत भुजबळ यांनी जाहीर सभेत मांडली. भुजबळ या मुद्द्यावरून शरद पवारांना आधीही बोल लावले आहेत. भुजबळांच्या या टिकेला उत्तर दिले पवारांचे खंदे समर्थक असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी. सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी एक पूर्वी ज्याला ट्विटर आणि सध्या एक्स म्हणून ओळखले जाते त्या सोशल नेटवर्कींग साईटवर एक पोस्ट टाकली होती. शरद पवारांना तेलगी प्रकरणात किती रस होता हे उघड करणारी ही पोस्ट होती.  

आव्हाड सांगतात, बनावट स्टँप घोटाळ्यात सीबीआयने तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र तयार केले आणि ते नियमानुसार छाननीसाठी राज्याचे अतिरिक्त महाधिवक्ता अमरेंद्र सरन यांच्याकडे पाठवले. त्यांनी मला फोन करून दिल्लीत बोलावून घेतले. मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला संपूर्ण प्रकरण समजावून सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी त्यांना शरद पवारांना फोन करायला सांगितले. दोघांमध्ये बराच वेळ बोलणे झाले. दोन महिन्यानंतर सीबीआयने याप्रकऱणी आरोपपत्र दाखल केले. त्या आरोपपत्रात मूळ आरोपपत्रात असेलली काही नावे गायब झाली होती. एका अदृश्य हाताने ती गायब केली. तो कोणाचा हात होता? तुम्हाला माहिती आहे तो कोणाचा हात होता.  

ही पोस्ट वाचल्यानंतर आव्हाडांचा ईशारा कोणाच्या अदृश्य हाताकडे होता हे उघड गुपित आहे. भुजबळांचा गेम करण्याच्या नादात आव्हाड शरद पवारांचा गेम करून मोकळे झाले. हे जेव्हा आव्हाडांच्या लक्षात आले तेव्हा उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी ही पोस्ट डीलिट केली.आव्हाडांनी केलेली पोस्ट खरी असेल तर त्यांचा अर्थ स्पष्ट आहे. शरद पवारांनी तपास प्रक्रियेत आणि पर्यायाने न्यायालयीन प्रक्रीयेत थेट हस्तक्षेप केला आहे. हा हस्तक्षेप एखाद्या जनहीताच्या प्रकरणात नाही तर देशात घडलेल्या एका महाघोटाळ्याच्या प्रकरणात. जो घोटाळा देशाच्या आर्थिक सुरक्षेशी संबंधित होता.

हे ही वाचा:

राज्यात हातभट्टीमुक्त गाव अभियान लवकरच राबवणार

दुष्काळ नियंत्रण वॅार रुम उभी करणार

२८ फुटी नटराज मूर्तीचा अडीच हजार किमी प्रवास

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल  

जितेंद्र आव्हाडांनी या प्रकरणात एडीशनल एडव्होकेट जनरल अमरेंद्र सरन यांनाही अडचणीत आणले आहे. आव्हाडांकडे कोणतेही घटनात्मक पद नसताना एक गोपनीय माहीती या सरन महोदयांनी आव्हाडांना का दिली? या प्रकरणात जर छगन भुजबळ गुंतलेले होते आणि त्यांचे नाव जर आरोपपत्रात होते तर पवारांनी हे नाव हटवण्यासाठी दबाव का आणला? फक्त भुजबळांचेच नाव नाही, आरोपपत्रातील आणखी काही नावे अदृश्य हाताच्या प्रभावामुळे हटवण्यात आली. ज्यांनी देशाचा खजिना लुटला त्यांना अभय दिले.  

आव्हाडांनी आधी ही पोस्ट टाकली त्यांना भुजबळांना खिजवायचे होते हे उघड आहे. परंतु प्रत्यक्षात तसे होते का? कि कही पे निगाहे कही पे निशाना… अशी आव्हाडांची रणनीती होती? बंगळुरूमध्ये तुरुंगवास भोगत असताना अब्दुल करीम तेलगीचा २०१७ मध्ये मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर बनावट स्टँप घोटाळ्यातील अनेक रहस्य त्याच्यासोबतच इतिहासजमा झाली. परंतु या घोटाळ्यासंदर्भात आव्हाडांकडे बरीच माहिती आहे, असे त्यांच्या पोस्टवरून उघड झाले आहे. शरद पवारांच्या हस्तक्षेपाच्या आधीचे मूळ आरोपपत्र आव्हाडांनी वाचले आहे. याप्रकरणात अमरेंद्र सरन यांच्यासह आव्हाडांची चौकशी होण्याची गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा