एखादे आंदोलन जेव्हा घेतलं जातं तेव्हा त्या आंदोलन यशस्वी व्हावं त्या आंदोलनाचा जो काही उद्देश असतो ज्या कारणासाठी आंदोलन घेतलं जातं ते उद्देश म्हणा किंवा ते कारण त्याला काहीतरी एक तोडगा निघाला पाहिजे त्याच उत्तर सापडलं पाहिजे. ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ज्यासाठी आंदोलन केलय त्यांना न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने आंदोलन करायचं असतं आणि पूर्वी अशी आंदोलन व्हायची. तेव्हा अगदी पाण्यासाठी सुद्धा आंदोलन व्हायची पण त्याच्या मागे उद्देश असायचा आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी सरकारची कुठेतरी कोंडी करणं, सरकारला धारेवर धरणं आणि ते अचूक दिशेने आंदोलन नेणं जेणेकरून सरकार कुठेतरी झुकलं पाहिजे सरकारने ते काम केलंच पाहिजे असा दबाव आणणारं आंदोलन असायला पाहिजे, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते आणि तसं आंदोलन झालं तर सरकार कुठेतरी ज्यांच्यावर अन्याय झालाय, त्या संदर्भात न्याय देण्याची प्रक्रिया सुरू करू शकतं काही बाबतीत काही त्यातल्या ज्या काही मागण्या आहे त्या मान्यतर येऊ शकतात पण तसं न करता केवळ एक स्टंट बाजी करायची आणि त्याच्यातून आपण काहीतरी प्रश्न मांडतो आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा तर त्याला आंदोलन म्हणत नाहीत आणि त्याच्यातून काही साध्य होत नाही.
मुंबईत शुक्रवारी एक आंदोलन झालं ते होतं काजू आणि आंबा बागायतदारांचं. कोकणातले जे काजू आंबा बागायतदार आहेत त्यांच जे काही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल आहे त्याच्याून त्यांच्या नुकसान भरपाई त्यांना मिळावी या दृष्टीने ते आंदोलन झालं तर मुळात त्या आंदोलनाचा हा जो काही उद्देश होता तो साध्य तरी झाला का ? आता हे जेव्हा आंदोलन आपण पाहतो ते आंदोलन कुठे झालं तर गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला अशा पद्धतीने मोर्चा काढण्यासाठी. हा रूट त्यांनी निश्चित केला होता मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर धडक मारायची आणि एक प्रकारे मुख्यमंत्र्यांपर्यंत विषय पोहोचवायचा. आंदोलन कुठल आहे तर कोकणातल्या काजू आणि आंबा बागायतदारांचं. त्यांच्यावर अन्याय झालेल आहे किव्वा त्यांच नुकसान झालेल आहे आणि त्याची भरपाई मिळाली पाहिजे, हा आंदोलनाचा उद्देश. आता हे नेमकं नुकसान किती झालंय किती गंभीर प्रश्न आहे हे काय आंदोलनातून कुठे स्पष्ट होत नव्हतं. त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यापूर्वी, पण आंदोलनात कुठेही त्या संदर्भातल काहीतरी वातावरण दिसतय असं कुठे दिसत नव्हत.
प्रामुख्याने कोकणामधल्या विषयांवर विशेषतः काजू आंबा या संदर्भात अनेक प्रश्न असतात अनेक वेळेला ते प्रश्न मांडले जातात किंवा त्या विषयीची चर्चा होते. अवकाळी पावसामुळे कदाचित काजू आणि आंब्याचे नुकसान होतं कधी मोहरच गळून पडतो, आंबाच पुरेशा प्रमाणात येत नाही. अनेक गोष्टी असतात हवामानही बदललेलं आहे. पण हा प्रश्न खरोखरच जर सोडवायचा असेल तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांची तर भेट घेतली पाहिजे त्यांच्याकडे जाऊन भेटून त्यांना निवेदन देणं त्यांच्याकडून त्यांच्यापर्यंत विषय पोहोचवणं त्या सरकारकडून काहीतरी आपण एक प्रकारे सरकारने काहीतरी आश्वासन देणं आणि नंतर ते जर पूर्ण झालं नाही ठराविक मुदतीत आंदोलन करणं हा मार्ग असू शकतो. पण इथे फक्त गिरगाव चौपाटी पासून वर्षा बंगल्यावर धडक मारायची त्याची सुद्धा परवानगी नव्हती. त्यामुळे पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना उचलल आणि आझाद मैदानाला नेल पुढे काहीच झालं नाही.
आंदोलकांमधले जर चेहरे पाहिले तर त्याच्यात कोकणातले किती लोक होते? विनायक राऊत हे कोकणातले लोकप्रतिनिधी म्हणता येतील. ते पूर्वी खासदार होते बाकी कोण आहेत? पक्षांचे नेते किंवा अशा कामगार संघटना असतील, शेतकरी संघटना असतील त्यांचे नेते डाव्या पक्षांचे नेते हे त्याच्यामध्ये दिसतायत. त्यांचा ना कोकणाशी संबंध, ना आंब्याशी संबंध, ना काजूशी संबंध. राजू शेट्टी हे आपण पाहिलेले आहेत ते कधी कापसाचे प्रश्न असतील, कधी उसाच्या शेतीचे प्रश्न असतील साखरेचा मुद्दा असेल कारखान्यांचा मुद्दा असेल बागायती शेतीचा मुद्दा असेल, दुधाचा प्रश्न असेल, हमीभावाचा मुद्दा असेल यावरती ते सातत्याने बोलत असतात. त्याविषयी आंदोलन घेत असतात. पण ते अचानक काजू आणि आंब्याच्या बागायतदारांना न्याय देताना पाहायला मिळाले. त्याविषयी त्यांनी आंदोलन करू नये असा अजिबात नाही पण अचानक सीजनल आंदोलन कसं काय झालं हा प्रश्न लोकांच्याही मनात येतो.
हर्षवर्धन सपकाळ हे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांचा कोकणाशी संबंध नाही ते पण आंदोलनात कोकणातले लोक तर आले पाहिजेत ? तिथे ते कोणीच नेते नाहीत मग प्रश्न निर्माण होतो खरोखरचा हा प्रश्न आहे का एवढा गंभीर? गंभीर असेल तर ज्यांना ते विषय माहिती आहे तिकडचे नेते आले पाहिजे, तर त्या आंदोलनाचा काहीतरी प्रभाव पडू शकतो. पण तसं कुठेही दिसलं नाही. त्याच्यामध्ये अंबादास दानवे आहे ते उबाठा गटाचे नेते आहेत, आता आमदार झालेले आहेत ते आहेत छत्रपती संभाजीनगरचे. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे. राजू शेट्टी हे वेगळीच आंदोलन यापूर्वी करत आलेले, पण ते अचानक शेतकऱ्यांच्या आंदोलना संदर्भात किवा काजू, आंबे बागायातदारांच्या आंदोलनात दिसले. ही सगळी मंडळी अचानक एकदम आंदोलनात एकत्र आली.
आता तर मुंबई गोवा महामार्ग याचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे? अनेक वर्ष झाली तो महामार्ग होत नाहीये, अनेक अडथळे त्यात असतील, सरकारच्या समोर सुद्धा अडचणी असतील, अनेक अडचणी असू शकतात त्यामुळे तो महामार्ग होता होत नाही गडकरींनी आश्वासन दिलं पण अजूनही तो झालेला नाही त्याविषयी कोणी आंदोलन घेतलं तर लोक मान्य करू शकतात की हा गंभीर प्रश्न आहे त्यावर आंदोलन व्हायला पाहिजे जेणेकरून तो महामार्ग लवकर पूर्ण होईल आणि कोकणातल्या लोकांना एक दिलासा मिळेल. पण त्यासाठी कोणी आंदोलन घेतलं नाही, तो कुठे मुद्दा आला नाही. कोकणातली जनता ही फारशी आंदोलन प्रेमी दिसत नाही. कधी ती अशा आंदोलनात उतरताना दिसत नाही एखाद रिफायनरीच्या विरोधात आंदोलन होत, कुठल्यातरी वाढवण बंदराच्या विरोधात आंदोलन होतं त्यावेळेला येतात पण ते सगळे कोकणातले असतात की नाही माहिती नाही.
हे ही वाचा:
श्रेयस अय्यरच्या नावावर आयपीएलमध्ये नकोसा विक्रम
निखत जरीनला हरवणारी साक्षी चमकली!
तिलक वर्मावरच्या टिप्पणीमुळे अर्शदीप वादात!
कोकणातला माणूस हा सातत्याने आंदोलन करणं, रस्ते अडवणं, पोस्टरबाजी करणं, घोषणाबाजी करणं मोठमोठ्या रॅली काढणं या फंदात पडलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचा आयुष्य सुषेगात असत. कोकणी माणूस आक्रमक नसतो. कोकणातला माणूस कधी मुंबईपर्यंत धडक मारत नाही मुंबईतलाच माणूस कोकणात जातो सुट्टीत. आंबे खाण्यासाठी, काजू खाण्यासाठी त्या पलीकडे तो आंदोलनाचा विचार करत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा गंभीर मुद्दा आहे पण कोकणातला शेतकरी अशा पद्धतीने आत्महत्या करताना दिसत नाही.मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो अचानक एकदम काजू आणि आंबा बागायतदारांचा मुद्दा आला तर त्याच्यात कोकणातल कोणच नाही, मग आंदोलन नेमक कशा कशासाठी करायचे ? खरोखर प्रश्न सोडवायचा आहे की फक्त स्टंटबाजी आहे.
आंदोलकांनी त्याच्या आधी जी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला भेट कोणाची घेतली उद्धव ठाकरेंची. उद्धव ठाकरेंची भेट घेतली पण त्याच्यातून काय साध्य झालं? उद्धव ठाकरे तर आमदार सुद्धा नाहीयेत आणि मुख्यमंत्री नाहीयेत बर ते जर आंदोलनाचे नेतृत्व करत असते, तर खरोखरच त्या आंदोलनाला वजन प्राप्त झालं असतं.
आंदोलनाचे नेतृत्व कोण करत होता हे माहिती नाही. राजू शेट्टी होते की हर्षवर्धन सपकाळ होते की अंबादास दानवे होते की विनायक राऊत होते. त्याच्यापैकी विनायक राऊत सोडले तर बाकीच्यांचा थेट कोकणाशी काही संबंधही नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की आंदोलन करायचं तर ते खरोखरच बागायतदारांचा प्रश्न सोडवायचा आहे. फडणविसांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सगळे गंभीर प्रश्न असतील तर ते मांडले पाहिजे होते. इतक इतक नुकसान झाले इतकी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. फडणविसांनी काय आश्वासन दिलं असतं काही दिवसांनी या किंवा काही दिवसांनी मुदत दिली असती त्यानंतर काम नसतं झालं ते तर मग आंदोलन करायला हरकत नव्हती. पण तसही काही झालेल नाही.
मुळात काजू आणि आंबा हे पीक जे आहे त्याच्यामध्ये आंबा सीजनलच आहे. भरपूर फायदा त्याच्यामध्ये मिळतो. आंबा हे जे फळ आहे त्याचे महत्त्व सगळ्यांना माहिती आहे पण शेवटी ते सीजनलच आहे ज्या पद्धतीने दुधाच्या भावाबद्दल बोललं जातं किंवा साखरे बद्दल बोललं जातं उसाच्या शेतीबद्दल बोललं जातं कापसाबद्दल बोललं जातं बागायती शेतीच होणाऱ्या नुकसानी बद्दल बोललं जातं त्याच प्रचंड प्रमाणात नुकसान होत असतं त्याविषयी आंदोलन होतात तेव्हा ते गंभीर प्रश्न असतात. ते स्पष्ट होतं पण इथे अचानक सीजनल आंदोलन झालं तेव्हा आग लागली कोकणामध्ये, आग लागली म्हणजे तो प्रश्न कोकणातला आहे पण बंब कुठे आहे तर गिरगाव चौपाटीला कोकणातला कोणी माणूस नाही तिकडे त्यामुळे कोकणातल्या माणसाला आश्चर्य वाटत खरोखरचा प्रश्न आपला आहे या आंदोलकांचा प्रश्न आहे फक्त यांना काहीतरी आंदोलन करायचे म्हणून चला काजू आणि आंब्या आंब्याचा जे काही प्रश्न आहे त्याच्यावरून आंदोलन करू.
