29 C
Mumbai
Tuesday, August 25, 2026
घरदेश दुनियानेपाळमध्ये साखरेचे दर गगनाला भिडले

नेपाळमध्ये साखरेचे दर गगनाला भिडले

स्वस्त साखरेसाठी नागरिक उत्तर प्रदेशात

Google News Follow

Related

नेपाळमध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खरेदीवर दिसून येत आहे. नेपाळमधील अनेक बाजारपेठांमध्ये साखरेचा दर तब्बल १४० ते १५० नेपाळी रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महागाईचा फटका बसलेल्या नेपाळी नागरिकांनी आता स्वस्त साखरेसाठी थेट भारतातील बाजारपेठांकडे मोर्चा वळवला आहे.

भारतामध्येही साखरेचे दर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देशातील अनेक बाजारपेठांमध्ये साखर साधारण ६५ ते ७० रुपये किलो दराने विकली जात आहे. मात्र, नेपाळच्या तुलनेत भारतीय बाजारातील दर कमी असल्याने सीमावर्ती भागातील ग्राहकांसाठी भारतातून साखर खरेदी करणे फायदेशीर ठरत आहे.
हे ही वाचा:
६० वर्षांवरील महिलांना योगी सरकारची भेट; बस प्रवास मोफत

दिल्लीतील शाळांमध्ये स्वाइन फ्लूचा अलर्ट

मॉस्कोमध्ये जयशंकर, बीजिंग मध्ये डोवाल

फटाक्याचा त्रास झाला म्हणून गणेश मिरवणुकीवर अंडी फेकली, आरोपी दानिशला अटक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील गौरीफंटा सीमेवर असलेल्या बनगवा मंडीत नेपाळमधून येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, बनगवा बाजारात साखर सुमारे १०० ते १०५ नेपाळी रुपये किलो दराने पडत आहे. त्याच साखरेसाठी नेपाळमध्ये ग्राहकांना १४० ते १५० नेपाळी रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक किलोमागे सुमारे ३० ते ४० नेपाळी रुपयांची बचत होत आहे.

महागाईमुळे रोजच्या गरजेच्या वस्तूंचे बजेट कोलमडले असताना साखरेच्या दरातील हा मोठा फरक नेपाळी ग्राहकांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. बनगवा बाजारात खरेदीसाठी आलेल्या नेपाळी महिलांनीही भारतातून साखर खरेदी केल्यास तुलनेने स्वस्त पडत असल्याचे सांगितले. त्यामुळे सीमा ओलांडून भारतात खरेदी करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा