30 C
Mumbai
Tuesday, August 25, 2026
घरदेश दुनियामुनीर सोबत नसतील तर पंतप्रधान शरीफ यांच्याशी हात कोण मिळवणार?

मुनीर सोबत नसतील तर पंतप्रधान शरीफ यांच्याशी हात कोण मिळवणार?

फजलुर रहमान यांचा घणाघात

Google News Follow

Related

पाकिस्तानमध्ये सरकार आणि लष्करातील संबंधांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम (JUI-F) चे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शहबाज शरीफ हे लष्कराच्या पाठिंब्याशिवाय राजकीयदृष्ट्या कमकुवत असल्याचा दावा त्यांनी केला.

फजलुर रहमान यांनी शहबाज शरीफ यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, लष्करप्रमुख सोबत नसतील तर शहबाज शरीफ यांच्याशी कोणी हातही मिळवणार नाही. जगभरात शहबाज शरीफ यांना मिळणारे महत्त्व हे त्यांच्या स्वतःच्या राजकीय ताकदीपेक्षा लष्कराच्या पाठिंब्यामुळे असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी शहबाज शरीफ यांना ‘बेचारे पंतप्रधान’ असे संबोधत त्यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

फजलुर रहमान यांनी पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर टीका करताना १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा दाखला दिला. पाकिस्तानी लष्कर मोठमोठे दावे करत असले तरी इतिहासातून धडा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. १९७१च्या युद्धाच्या अखेरीस पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. १६ डिसेंबर १९७१ रोजी ढाक्यात सुमारे ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली, त्यानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.

हे ही वाचा:

अपात्रता याचिकेसंदर्भात तृणमूलच्या २० बंडखोर खासदारांना नोटीस

सोन्याला ‘सोन्याचा भाव’; चांदीची मात्र घसरण

“नारळ फोडणे, कापूर पेटवणे चुकीचे”; हिंदू प्रथांविरोधात पत्रकवाटप

शाळेच्या गणवेशासोबत हिजाब घालता येणार नाही!

फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या राजकारणातील लष्कराच्या हस्तक्षेपावरही प्रश्न उपस्थित केला. राजकीय कार्यकर्त्यांना लष्करी संस्थांच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसेल, तर लष्करालाही राजकारणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसावा, असे त्यांनी म्हटले. पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि इतर भागांतील अस्थिरतेचाही त्यांनी उल्लेख केला. देशातील नागरिक अडचणीत असताना सरकार आणि लष्कराकडून केवळ मोठमोठे दावे केले जात असल्याची टीका त्यांनी केली. बलुचिस्तानमधील हिंसाचार, सुरक्षा परिस्थिती आणि नागरिकांच्या समस्यांवरूनही फजलुर रहमान यांनी सरकारला घेरले. देशातील काही भागांत संघर्ष सुरू असताना सत्ताधारी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दावे करत असल्याचे त्यांनी म्हटले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा