बांगलादेशी राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्ती आणि बंडखोरी घडवून आणणाऱ्या विद्यार्थी चळवळीतील शरीफ उस्मान हादीचा मृत्यू झाल्यानंतर बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उसळला आहे. यानंतर आता संतप्त जमावाने देशातील काही प्रभावशाली माध्यम संस्थांना लक्ष्य केल्याची माहिती आहे. तसेच काही पत्रकारांवर हल्ला केला आहे. गुरुवारी रात्री उशिरा आणि शुक्रवारी पहाटे, निदर्शकांनी प्रथम आलो आणि द डेली स्टारच्या मुख्यालयावर हल्ला केला, इमारतींना आग लावली आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
हिंसक जमावाने न्यू एजचे संपादक आणि बांगलादेशच्या माध्यम क्षेत्रातील एक प्रमुख आवाज असलेले ज्येष्ठ पत्रकार नुरुल कबीर यांच्यावरही हल्ला केला. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना राजवट उलथवून टाकणाऱ्या उठावाचा प्रमुख चेहरा आणि इन्कलाब मंचा या कार्यकर्त्या गटाचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर हे हल्ले केले जात आहेत.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रथम आलोच्या कार्यालयावर हल्ला केला, त्यानंतर लवकरच ‘द डेली स्टारवर’ही असाच हल्ला झाला. स्थानिक माध्यमांनुसार, इन्कलाब मंचाचे प्रवक्ते शरीफ उस्मान बिन हादी याच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर वृत्तपत्र कार्यालयाबाहेर लोकांचे गट जमले आणि त्यांनी समन्वित हल्ले सुरू केले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये जमाव काठ्यांनी इमारतीची तोडफोड करताना दिसत आहे, तर प्रथम आलोच्या कार्यालयाबाहेर रस्त्यावर आग पेटताना दिसत आहेत. हिंसाचाराच्या वेळी काही कर्मचारी दोन्ही इमारतींमध्ये अडकल्याचेही वृत्त आहे.
हे ही वाचा..
‘सर तन से जुदा’ ही घोषणा भारताच्या एकता, अखंडतेला आव्हान देणारी
सौदी अरेबियाने ५६,००० पाकिस्तानी भिकाऱ्यांना केले हद्दपार!
कदंबा नौदल तळाजवळ आढळला जीपीएस बसवलेला ‘सीगल’; संशोधन की हेरगिरी?
विकसित भारत – जी राम जी विधेयकाला लोकसभेत मंजुरी!
१२ डिसेंबर रोजी ढाका येथे अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात गोळी झाडल्यानंतर विद्यार्थी नेते हादी यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी सिंगापूरला नेण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी त्याचे निधन झाले आणि यानंतर त्याचे समर्थक रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी निदर्शकांनी भारतविरोधी घोषणा दिल्या आणि भारतीय राजनैतिक मिशनना लक्ष्य केले. बांगलादेशी अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी संशयितांची ओळख पटवली असून गोळीबार करणारा बहुधा भारतात पळून गेला असावा. ढाका सरकारने भारतीय राजदूतालाही बोलावून स्पष्टीकरण मागितले.







