31.4 C
Mumbai
Tuesday, June 9, 2026
घरदेश दुनियाअमेरिकन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ओमान किनाऱ्याजवळून २४ भारतीय खलाशांची सुटका

अमेरिकन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ओमान किनाऱ्याजवळून २४ भारतीय खलाशांची सुटका

दोन दिवसांत भारतात परतण्याची शक्यता

Google News Follow

Related

इराणशी संबंध असल्याच्या कारणावरून अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरे जात असलेल्या एमटी मारिवेक्स (Marivex) या तेलवाहू जहाजावर झालेल्या अमेरिकन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर त्यावरील २४ भारतीय खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. ओमानच्या आग्नेय किनाऱ्याजवळ सोमवारी (८ जून) ही घटना घडली होती. सर्व खलाशांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढून ओमानमधील मसिरा बेटावर नेण्यात आले असून, पुढील दोन दिवसांत त्यांना भारतात परत आणले जाण्याची शक्यता आहे.

फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया (FSUI) चे महासचिव मनोज यादव यांना खलाशांनी पाठवलेल्या ऑडिओ संदेशांमध्ये म्हटले आहे, “हे मोटर टँकर मारिवेक्स आहे. जहाजाला आग लागली आहे. जहाज बुडत आहे. अमेरिकन नौदलाने आमच्या इंजिन रूमवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. जहाजाच्या खालच्या भागात मोठे भगदाड पडले आहे.” दरम्यान, अमेरिकन सेंट्रल कमांड (Centcom) ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “इराणविरोधातील सुरू असलेल्या नाकेबंदीचे उल्लंघन करून एका इराणी बंदराकडे जात असलेल्या रिकाम्या तेलवाहू जहाजाला अमेरिकन सैन्याने ८ जून रोजी ओमानच्या आखातात निष्क्रिय केले (हल्ला केला). चालक दल अमेरिकन सैन्याच्या सूचनांचे पालन करत नसल्याने, यूएसएस अब्राहम लिंकन (CVN-72) या विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण केलेल्या F/A-18 सुपर हॉर्नेट लढाऊ विमानाने जहाजाच्या अभियांत्रिकी आणि सुकाणू विभागावर अचूक शस्त्रास्त्रांचा मारा केला. त्यामुळे मारिवेक्स आता इराणच्या दिशेने पुढे जात नाही.”

खलाशांच्या मते, हल्ल्यानंतर जहाजाच्या मागील भागात भीषण आग लागली होती. त्यांनी असा आरोपही केला की जहाजाच्या एका बाजूच्या लाइफबोटी हल्ल्यात नुकसानग्रस्त झाल्या, तर दुसऱ्या बाजूच्या लाइफबोटींपर्यंत आगीमुळे पोहोचणे अशक्य झाले होते. तसेच जवळच असलेल्या अमेरिकन युद्धनौकेने तातडीने मदत केली नाही आणि समुद्री बचाव यंत्रणांकडूनही सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही, असा दावा चालक दलाने केला आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या माहितीनुसार, मुंबईस्थित मेरीटाईम रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटर (MRCC) ला दुपारी सुमारे २.२० वाजता या हल्ल्याची माहिती मिळाली. जहाजावरील एका खलाशाच्या नातेवाईकाने ही माहिती दिल्यानंतर एमआरसीसी मुंबईने तातडीने ओमान मेरीटाईम सर्च अँड रेस्क्यू सेंटर (OMSC) शी संपर्क साधून बचाव मोहीम सुरू केली. त्यानंतर राबविण्यात आलेल्या संयुक्त बचाव मोहिमेत सर्व २४ भारतीय खलाशांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मनोज यादव यांनी सांगितले की, सर्व खलाशी सुरक्षित असले तरी ते मानसिक धक्क्यात आहेत. तसेच हल्ल्यात बहुतांश खलाशांचे मोबाईल फोनही हरवले आहेत.

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे संचालक ओपेश कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आज दुपारी सुमारे १.३० वाजता ओमान किनाऱ्याजवळ एमटी मारिवेक्स या जहाजाला आग लागल्याची माहिती मिळाली होती.” मात्र, आग लागण्याच्या कारणांवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. जहाजावरील सर्व २४ भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची पुष्टी त्यांनी केली. तसेच हे जहाज रिकामे होते आणि होर्मुझ सामुद्रधुनीपासून दूर असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मोदींनी नेहरूंना टाकले मागे; सर्वाधिक काळ पंतप्रधान

कोचिंग सेंटर गोळीबार प्रकरणात खान सरांच्या अटकेला स्थगिती

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनापूर्वी झालेल्या हिंसक संघर्षात ११ ठार

“सावध राहा, एकटे पडाल!” ट्रम्प यांचा नेतान्याहू यांना पुन्हा इशारा

शिपिंग डेटाबेस इक्वासिस (Equasis) च्या माहितीनुसार, अमेरिकेने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मारिवेक्सवर निर्बंध लादले होते. एप्रिल २०२६ मध्ये युद्धविराम जाहीर झाल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडणाऱ्या मोजक्या जहाजांपैकी हे एक जहाज होते. त्यावेळी या जहाजाने इराणमधील बंदर अब्बास येथून मंगळुरूपर्यंत तेलाची वाहतूक केली होती. एफएसयूआयच्या माहितीनुसार, त्यानंतर हे जहाज सतत संघर्षग्रस्त सागरी क्षेत्रात कार्यरत होते. जहाजाने शेवटचा नोंदवलेला थांबा कर्नाटकातील कारवार बंदरात घेतला होता आणि ते ओमानमधील दुक्म बंदराकडे जात होते. दरम्यान, युनायटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स सेंटरने या घटनेची नोंद “संशयास्पद हालचाल” म्हणून केली असून, हल्ल्याची माहिती दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
312,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा