29 C
Mumbai
Friday, March 27, 2026
घरदेश दुनियाएअर कॅनडाचे विमान लँडिंगवेळी अग्निशमन दलाच्या वाहनाला धडकले

एअर कॅनडाचे विमान लँडिंगवेळी अग्निशमन दलाच्या वाहनाला धडकले

न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावरील घटना

Google News Follow

Related

न्यूयॉर्क विमानतळावर अपघात झाला असून एअर कॅनडाचे विमान अग्निशमन दलाच्या ट्रकला धडकल्याची माहिती समोर आली आहे. फ्लाइटराडार२४ च्या फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, मॉन्ट्रियलहून येणाऱ्या एअर कॅनडा एक्सप्रेसच्या विमानाची सोमवारी पहाटे न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर उतरताना एका वाहनाशी टक्कर झाली. या घटनेमुळे विमान वाहतूक प्राधिकरणाने व्यस्त विमानतळावरील कामकाज थांबवले असून ज्यामुळे उड्डाण वेळापत्रकात संभाव्य व्यत्ययाची चिंता वाढली आहे.

न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर एअर कॅनडा एक्सप्रेसच्या CRJ-900 विमानाची रनवे क्रमांक ४ वर एका ट्रकशी धडक झाल्याने सर्व विमानसेवा थांबवण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर आपत्कालीन प्रतिसाद सुरू करण्यात आला असून विमानतळावरील विमानसेवा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. हे विमान एअर कॅनडा एक्सप्रेसचे होते आणि ते मॉन्ट्रियलहून येत होते. प्राथमिक माहितीनुसार, विमान उतरताना एका अग्निशमन दलाच्या ट्रकशी धडकले.

ऑनलाइन समोर आलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंग आणि प्राथमिक फ्लाइट ट्रॅकिंग डेटामधून असे दिसून येते की, धडकेच्या काही क्षण आधी, एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानाचे दोन्ही वैमानिक आणि जमिनीवरील वाहन या दोघांनाही थांबण्याचे वारंवार निर्देश दिले होते. या धडकेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून, त्यामध्ये विमानतळावर सुरू असलेले बचावकार्य दिसत आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तान सुपर लीगला युद्धाचा फटका; स्पर्धा फक्त दोन शहरांपुरती मर्यादित

… म्हणून इराणने क्षेपणास्त्रांवर लावला स्पॅनिश पंतप्रधानांचा फोटो

इराणी ऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्यास होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करणार!

२० लाख अमेरिकन डॉलर्स मोजा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज घेऊन जा!

दरम्यान, न्यूयॉर्क अग्निशमन विभागाने सांगितले की किमान पाच अग्निशमन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. विमानातील १०० हून अधिक प्रवासीही जखमी झाल्याचे वृत्त आहे. विमान बचाव आणि अग्निशमन (ARFF) पथकांसह आपत्कालीन प्रतिसाद पथके अजूनही घटनास्थळी आहेत. मात्र अधिकाऱ्यांनी अद्याप अंतिम आकडेवारी जाहीर केलेली नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा