22.9 C
Mumbai
Monday, January 19, 2026
घरदेश दुनियाइस्त्रायल- इराणमधील तणावानंतर एअर इंडियाची तेल अवीव दरम्यानची विमानसेवा स्थगित

इस्त्रायल- इराणमधील तणावानंतर एअर इंडियाची तेल अवीव दरम्यानची विमानसेवा स्थगित

सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय

Google News Follow

Related

मध्य पूर्व आशियात युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता असून इस्त्रायल आणि इराणमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. अशातच आता वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अवीव दरम्यानची विमानसेवा काही दिवस स्थगित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने एअर इंडियाने आपल्या उड्डाणांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया इस्रायलची राजधानी तेल अवीव दरम्यानची विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आणि तेल अवीवदरम्यान दर आठवड्याला चार विमानसेवा चालवण्यात येतात, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली आहे.

“मध्य पूर्वेतील परिस्थिती लक्षात घेता तेल अवीवला जाणारी आणि तेथून येणारी आमची उड्डाणे ३० एप्रिलपर्यंत स्थगित राहतील. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. या काळात ज्यांनी तेल अवीवला जाण्याचे किंवा तेथून येण्याचे बुकिंग केले असेल त्यांना आम्ही सहकार्य करत आहोत. या प्रवाशांना तिकिट रद्द करणे किंवा रिशेड्युल करण्याकरता एकवेळ शुल्कमाफी देण्यात येत आहे. एअर इंडियासाठी आमच्या ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे,” असं एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दिल्ली ते तेल अवीव या प्रवासासाठी एअर इंडिया आठवड्याला चार उड्डाणे चालवतात. परंतु, गेल्या काही दिवसांत परिस्थिती चिघळत असल्याने अनेक विमान वाहतूक कंपन्यांनी या मार्गादरम्यान सेवा खंडित केली होती. १५ एप्रिल रोजी जर्मन एअरलाइन ग्रुप लुफ्थान्साने इराणच्या क्षेपणास्त्र आणि इस्त्रायलवरील ड्रोन हल्ल्यानंतर अम्मान, बेरूत, एरबिल आणि तेल अवीवची उड्डाणे देखील स्थगित केली आहेत.

हे ही वाचा:

पत्नीला टॉयलेट क्लिनर मिसळलेले जेवण दिल्याचा इम्रान खान यांचा आरोप

“संजय राऊतांनी वादग्रस्त बोलताना स्वतःच्या मुलीकडे, आईकडे आणि पत्नीकडे बघायला हवे होते”

‘माझ्या मुलीची हत्या ‘लव्ह जिहाद’मुळे’

मोदीस्तुती करणारे गाणे गाणाऱ्या युट्युबरवर मुस्लिम तरुणांचा हल्ला

इस्रायलने सीरियातील इराणच्या दूतावासावर हल्ला केल्यानंतर आणि इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पश्चिम आशिया युद्धाच्या छायेत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही टाटा समूहाच्या एअर इंडियाने ७ ऑक्टोबर रोजी भारत ते तेल अवीव ही उड्डाण सेवा रद्द केली होती. इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली होती. परंतु, वातावरण निवळल्यानतंर ४ मार्च रोजी एअर इंडियाने ही सेवा पुन्हा सुरू केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा