31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेषराज्यातील नक्षलग्रस्त मानल्या जाणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान

राज्यातील नक्षलग्रस्त मानल्या जाणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान

देशभरातील १०२ मतदार संघात शुक्रवार, १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं

Google News Follow

Related

राज्यासह देशभरातील १०२ मतदार संघात शुक्रवार, १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रातील ४८ पैकी ५ मतदारसंघांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश होता. आता या पाचही मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं, याची आकडेवारी समोर आली आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानात पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५४.८५ टक्के मतदान झाले. यात विशेष म्हणजे नक्षलग्रस्त मानल्या जाणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात चांगल्या टक्क्यांनी मतदान झाले आहे. राज्यातील इतर चार मतदारसंघांच्या तुलनेत या मतदार संघात सर्वाधिक मतदान झालं आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ६५.९५ टक्के मतदान झालं आहे.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान

‘माझ्या मुलीची हत्या ‘लव्ह जिहाद’मुळे’

मोदीस्तुती करणारे गाणे गाणाऱ्या युट्युबरवर मुस्लिम तरुणांचा हल्ला

मुंबईचा पैसा, लखनौची जमीन, ठाकरेंच्या नावाने गलका…

गडचिरोलीच्या तुलनेत नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी टक्के मतदान झालं आहे. नागपूरमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ४७.९१ टक्के मतदान पार पडलं आहे. राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान गडचिरोली-चिमूर मतदारसंघानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात झालं आहे. इथे ५६.८७ टक्के मतदान पार पडलं आहे. त्यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ५५.११ टक्के मतदान पार पडलं आहे. यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात ५२.३८ टक्के मतदान पार पडलं आहे. तुलनेने सर्वात कमी मतदान हे नागपूरमध्ये ४७.९१ टक्के इतकं झालं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा