31 C
Mumbai
Saturday, May 25, 2024
घरसंपादकीयमुंबईचा पैसा, लखनौची जमीन, ठाकरेंच्या नावाने गलका...

मुंबईचा पैसा, लखनौची जमीन, ठाकरेंच्या नावाने गलका…

रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यात आर्थिक संबंध

Google News Follow

Related

अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिराच्या निर्मितीनंतर अयोध्येच्या आसपासच्या परिसरातही जमिनीच्या किमती प्रचंड वधारल्या आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुद्धा अयोध्येलगत दहा एकर जमीन विकत घेतली आहे. महाराष्ट्रातील एका बड्या हवाला ऑपरेटरची नजर इथे वळली असून लखनौमध्ये विकसित होत असलेल्या २०० एकरांच्या भव्य टाऊनशिपमध्ये त्याची गुंतवणूक आहे.

नंदकिशोर चतुर्वेदी असे या हवाला ऑपरेटरचे नाव असून त्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाशी घट्ट संबंध असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. चतुर्वेदी हा मुळचा मथुरेचा. योगायोग असा की काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मथुरेचा दौरा केला होता.

ट्रू लाईव्ह होम्स या कंपनीच्या माध्यमातून लखनौ भव्य टाऊनशिप विकसित करण्यात येत असून ही कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी या हवाला ऑपरेटरशी संबंधित आहे. ही कंपनी पूर्वी हमसफर डीलर्स या नावाने ओळखली जात असे. याच कंपनीने आदित्य ठाकरे यांचा मामा श्रीधर पाटणकर याच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीला ३० कोटी रुपये कर्ज दिले होते. कर्ज विनातारण होते हे महत्वाचे. या प्रकरणी हवालाचा व्यवहार झाल्याचे आढळल्यामुळे ईडीने साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीच्या ठाण्यातील ११ सदनिका जप्त केल्या होत्या. ठाकरे कुटुंबीय या संपूर्ण प्रकरणात मीठाची गुळणी करून बसले होते.

लखनौमधील टाऊनशिपचा संबंधही ट्रू लाईव्ह होम्स या कंपनीशी आहे. ही जमीन सहारा समुहाच्या मालकीची होती. या २०० एकराच्या टाऊनशिपसाठी ट्रू लाईव्ह होम्सने पुढाकार घेतला. पिंटेल ग्रुपची स्थापना पिंटेल इन्फ्राझोन या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करून लखनौमधील जमीन विकत घेण्यात आली.

हे ही वाचा:

सुनेला हिणवणाऱ्या शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस!

मणिपूर मतदान केंद्रावर गोळीबार, कव्हरसाठी मतदारांची धावपळ!

प. बंगालच्या कूचबिहारमध्ये मतदानादरम्यान दगडफेक

शेवटच्या षटकात बुमराह-कोएत्जीची कमाल; मुंबईची पंजाबवर मात

हा व्यवहार सिद्धीविनायक इन्फ्राझोन या एलएलपीच्या माध्यमातून झाला. व्यवहारासाठी मुंबईतून या एलएलपीमध्ये पैसे आले. याचा अर्थ पैसा पुरवणारा मुंबईत बसला होता. नंदकिशोर चतुर्वेदीच्या आठ शेल कंपन्यांचा या व्यवहारासाठी वापर करण्यात आला. आयकर विभागाने या व्यवहारात हवालाचा वापर झाल्याचा ठपका ठेवून ही जमीन जप्त केलेली आहे.

नंदकिशोर चतुर्वेदी हा इसम या व्यवहाराचा कर्ताधर्ता आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभाग या तिन्ही तपास यंत्रणांना विविध प्रकरणांमध्ये चतुर्वेदी हवा आहे. परंतु चतुर्वेदी मात्र अनेक महिने गायब आहे. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आलेली आहे. परंतु त्याचा थांगपत्ता कोणालाही लागत नाही.

आयकर विभागाने लखनौमधील ही जमीन जप्त केल्याचे प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर भाजपा नेते किरीट सौमय्या आणि शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी एक्सवर पोस्ट अपलोड करून ठाकरे कुटुंबियांकडे बोट दाखवले आहे. कारण यापूर्वी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यात आर्थिक संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. विरोधकांच्या आरोपानंतरही ठाकरे कुटुंबीय आणि त्यांचे वाचाळवीर प्रवक्ते संजय राऊत मौन आहेत.

लखनौमध्ये २०० एकरच्या जमिनीवर टाऊनशिपचा प्रकल्प ८०० कोटींचा होता. प्रकल्पासाठी ठेवण्यात आलेल्या निकषांमध्ये अर्जदार कंसोर्टीअमची अर्थात कंपन्यांच्या समुहाची उलाढाल १०० कोटी रुपये असावी असे म्हटले आहे. एवढा पैसा एखाद्या उद्योजकाकडे किंवा नेत्याकडेच असू शकतो. जमीन खरेदी करण्यासाठी आलेली रक्कम मुंबईतून आलेली आहे, हा मुद्दाही महत्वाचा आहे. अर्थात हा पैसा कोणाचा हा तपासाचा भाग आहे. चतुर्वेदी सापडत नाही तोपर्यंत महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता कमी आहे.

पैसा चतुर्वेदीने गुंतवला असला तरी हा पैसा कोणाचा हे चतुर्वेदीच सांगू शकतो. शीतल म्हात्रे आणि किरीट सोमय्या यांनी ठाकरेंना जाब विचारला आहे. यापूर्वी पाटणकर आणि चतुर्वेदींचा झालेला व्यवहार पुराव्यानिशी सिद्ध झालेला आहे. लखनौच्या व्यवहारात ही माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही. तरीही ठाकरेंचे विरोध संशयाचा पूर्णपणे फायदा घेऊ शकतात.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आदित्य ठाकरे एका मंदिराच्या उद्घाटनासाठी मथुरेत गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रियांका चतुर्वेदीही होत्या. नंदकिशोर चतुर्वेदीचे मुळ गाव मथुराच आहे. हा योगायोग असण्याची शक्यता आहे. लखनौच्या टाऊनशिप प्रकल्पात ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. लखनौमध्ये २०० एकर जमीन खरेदी करण्यासाठी गुंतवण्यात आलेली रक्कम कोट्यवधीच्या घरात असेल. हा पैसा कोणाचा या प्रश्नाचे उत्तर खणून काढण्याचे काम सुरू झाले आहे. हाती उत्तर येईपर्यंत वाट पाहावी लागले.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा