31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरविशेषशेवटच्या षटकात बुमराह-कोएत्जीची कमाल; मुंबईची पंजाबवर मात

शेवटच्या षटकात बुमराह-कोएत्जीची कमाल; मुंबईची पंजाबवर मात

Google News Follow

Related

आयपीएलमध्ये मुंबईने पंजाबवर नऊ धावांनी मात करून गुणतक्त्यात सातवे स्थान मिळवले आहे. आत मुंबईच्या खात्यात सहा गुण जमा झाले असून पंजाबचा संघ चार गुणांसह नवव्या स्थानी आहे. या सामन्यात नाणेफेक हरून पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या मुंबईने २० षटकांत १९२ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना पंजाबचा संघ १९.१ षटकांत सर्वबाद १८३ धावाच करू शकला. मुंबईसाठी गेराल्ड कोएत्जी आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. बुमराह याला सामनावीराने गौरवण्यात आले.

पंजाबची आघाडीची फळी कोलमडली

१९३च्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला सुरुवातीलाच धक्के बसले. संघाने १४ धावसंख्येतच चार विकेट गमावल्या. तर, हरप्रित सिंग १३ धावा करून बाद झाला. ही पंजाबची पाचवी विकेट. या सामन्यात सॅम करनने सहा, प्रभसिमरन सिंगने शून्य, रिली रुसोने एक आणि लियाम लिविंगस्टोन याने अवघी एक धाव केली. या सामन्यात हरप्रीत सिंग आणि शशांक सिंग यांच्या दरम्यान ३५ धावांची भागीदारी झाली. शशांकने दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या.

आशुतोष शर्माची दमदार खेळी

पंजाबच्या आशुतोष शर्मा याने २८ चेंडूंत ६१ धावांची वादळी खेळी केली. या दरम्यान त्यांनी २१७.८५ धावगतीने दोन चौकार आणि सात षटकार लगावले. हे त्याच्या कारकिर्दीतले पहिलेवहिले अर्धशतक ठरले. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सामन्यात जितेश शर्मा याने नऊ, हरप्रीत बराडने २१, कगिसो रबाडा याने आठ आणि हर्षल पटेल याने नाबाद एक धाव केली. मुंबईच्या आकाश मधवाल, हार्दिक पांड्या आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

सूर्यकुमारचा दबदबा

मुंबईच्या वतीने सूर्यकुमार याने आयपीएलमधील २३वे अर्धशतक ठोकले. त्याने सात चौकार व तीन षटकारांसह ७८ धावा केल्या. मुंबईला पहिला धक्का बसला तो ईशान किशनच्या रूपात. तो अवघ्या आठ धावा करून बाद झाला. रबाडाने त्याची विकेट घेतली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने रोहित शर्माच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने २५चेंडूंत ३६ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्यानंतर सूर्यकुमारने तिलक वर्माच्या साथीने ४९ धावांची भागीदारी केली. मुंबईची धावसंख्या १४८ असताना सॅम करनने त्याला बाद केले. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या हार्दिक पांड्यानेही निराशा केली. तो केवळ १० धावा करून बाद झाला. तिलक वर्माने १८८.८८ धावगतीने ३४ धावा केल्या. या नाबाद खेळीदरम्यान त्यांनी दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले.

हे ही वाचा:

मोदींच्या तिसऱ्या पर्वात एक-दोन वर्षांत नक्षलवादाचा नायनाट करू

पट्टा-काठीने मारहाण, तोंडात फेव्हीकॉल, जखमांवर मीठ…महिलेवर अत्याचार, लव्ह जिहादचा संशय

इराणने जप्त केलेल्या इस्रायली जहाजावरील भारतीय डेक कॅडेट सुखरूप परतली मायदेशी

पक्षांना निधी पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय निधीचा पर्याय

हर्षल पटेलच्या सर्वाधिक विकेट

शेवटच्या षटकात हर्षल पटेल याने तीन विकेट घेतल्या. पंजाबसाठी त्यांनी या सामन्यात सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. सॅम करनने दोन तर, कगिसो रबाडाने एक विकेट घेतली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा