31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरदेश दुनियामध्य पूर्व आशियात युद्ध भडकणार? इराणच्या शहरांवर इस्रायलकडून क्षेपणास्त्र हल्ला

मध्य पूर्व आशियात युद्ध भडकणार? इराणच्या शहरांवर इस्रायलकडून क्षेपणास्त्र हल्ला

इराणच्या आण्विक केंद्रालाही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती

Google News Follow

Related

मध्य पूर्व आशियात युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता असून इस्त्रायल आणि इराणचा वाद आता आणखी चिघळणार असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीचं इराणने इस्त्रायलवर तब्बल २०० क्षेपणास्त्र डागली होती. त्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. अशातच इस्रायलने शुक्रवार, १९ एप्रिल रोजी इराणच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. यात इराणच्या आण्विक केंद्रालाही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी पहाटे इराणवर हल्ला झाला. इराणच्या इस्फहान शहरातील विमानतळावर स्फोटाचा आवाज ऐकू आला. इस्फहान शहरात अनेक अणू प्रकल्प आहेत. इराणचा सर्वात मोठा युरेनियम कार्यक्रमही या ठिकाणा आहे. या हल्लानंतर अनेक उड्डाणे वळवण्यात आली आहेत. यासंबंधीचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आले आहेत. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने सांगितलं की, उत्तर इस्रायलच्या अरब अल अरामशेमध्ये इमर्जन्सी सायरन वाजवला गेला.

काही दिवसांपूर्वी सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर इस्रायलने हवाई हल्ला केला होता. यात इराणचे बडे लष्करी अधिकारी ठार झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी १४ एप्रिल रोजीच इराणने इस्रायलवर थेट हल्ला केला. यात इस्रायलवर २०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले होते. या हल्ल्याल प्रतिउत्तर आणि बदला घेण्यासाठी इस्रायलने हा पलटवार केला आहे.

हे ही वाचा:

शेवटच्या षटकात बुमराह-कोएत्जीची कमाल; मुंबईची पंजाबवर मात

मोदींच्या तिसऱ्या पर्वात एक-दोन वर्षांत नक्षलवादाचा नायनाट करू

पट्टा-काठीने मारहाण, तोंडात फेव्हीकॉल, जखमांवर मीठ…महिलेवर अत्याचार, लव्ह जिहादचा संशय

इराणने जप्त केलेल्या इस्रायली जहाजावरील भारतीय डेक कॅडेट सुखरूप परतली मायदेशी

सीरियामधील इराणी दूतावासावर इस्त्रायलने १ एप्रिल रोजी एअर स्ट्राईक केला होता. त्यात इराणच्या दोन टॉप कमांडरसह १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात कमांडर ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रजा जाहेदी याचा समावेश होता. परंतु इस्त्रायलने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नव्हती. इराण हमासला मदत करत असल्यामुळे इस्त्रायलने ही कारवाई केली होती, असे सांगितले जात आहे. त्यानंतर इराणने इस्त्रायलला बदला घेण्याची धमकी दिली होती. १४ एप्रिल रोजी इराणने इस्त्रायवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्याच्या उत्तरात १९ एप्रिल रोजी ही कारवाई इस्त्रायलने इराणवर केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा