31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरविशेषछगन भुजबळांची नाशिकमधून माघार, गोडसेंचा मार्ग मोकळा!

छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, गोडसेंचा मार्ग मोकळा!

पंतप्रधान मोदी अन अमित शहांचे मानले आभार

Google News Follow

Related

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे.मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.पंतप्रधान नरेंद्र आणि गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वास ठेवून नाव सुचवल्या बद्दल छगन भुजबळांनी त्यांचे आभार मानले.

नाशिकच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी जोर लावला होता. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे देखील या जागेसाठी आग्रही होते.या जागेवरून छगन भुजबळच उभे राहणार असे चित्र होते आणि तशा बातम्याही समोर येत होत्या.मात्र, आता छगन भुजबळ यांनी नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेतली आहे.त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे प्रथमतः आभार कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून नाशिकच्या जागेसाठी माझे नाव सुचवले.माझ्या नावावर अमित शहांनी शिक्कामोर्तब केलं होत.पण, उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशिर झाल्याचंही भुजबळ म्हणाले.दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा यांच्या बैठकीत काय घडलं हे सुद्धा छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हे ही वाचा:

मणिपूर मतदान केंद्रावर गोळीबार, कव्हरसाठी मतदारांची धावपळ!

पहिल्यांदा मतदान केलेत, आता एअर इंडिया एक्स्प्रेसमधून करा स्वस्तात प्रवास!

सुनेला हिणवणाऱ्या शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस!

‘संपूर्ण जगाने पाहिली आहे मोहम्मद शमीची कमाल’

ते म्हणाले की, होळीच्या दिवशी अजित पवारांचे बोलावणे आल्यांनतर मी बंगल्यावर गेलो.त्या ठिकाणी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे पहिलाच येऊन बसले होते.तिथे गेल्यावर नाशिकच्या जागेवरून मला सांगितलं की, नाशिक मधून तुम्हाला उतरावे लागेल.अमित शहांनी सुद्धा तुमचेच नाव सुचवले.शिंदेनी जागा मागितली, पण भुजबळ तिथे लढतील असं दिल्लीतून सागंण्यात आले.

ते पुढे म्हणाले की, दिल्लीमध्ये माझ्या नावावर खरंच शिक्कामोर्तब केलं आहे का? यासाठी मी फडणवीसांना फोन केला.तेव्हा फडणवीस म्हणाले, हो तुम्हाला उभे राहायचं आहे, केंद्रातून निर्णय घेण्यात आला आहे.चंद्रशेखर बावनकुळे देखील म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा निरोप होता आणि अमित शहा यांनी देखील तुम्हालाच उभे राहण्यास सांगितलं.मात्र, उमेदवारीची घोषणा करण्यात वेळ झाला, असे देखील भुजबळ म्हणाले.

ते पुढे म्हणाले, नाशिकचा तिढा सुटलेला दिसत नाहीये. जेवढा उशिर होईल तेवढं नाशिकच्या जागेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ताबोडतोब निर्णय घेणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले. कोण जागा लढवणार, कोण उमेदवार हे जाहीर करायला हवं. अन्यथा अडचण निर्माण होईल. प्रतिस्पर्धी कामाला लागले आहेत. संदिग्धता असल्याने ही संदिग्धता आपण दूर करायला हवी. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा