31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरक्राईमनामाप. बंगालच्या कूचबिहारमध्ये मतदानादरम्यान दगडफेक

प. बंगालच्या कूचबिहारमध्ये मतदानादरम्यान दगडफेक

Google News Follow

Related

देशातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यांतील जागांसाठी शुक्रवार, १९ एप्रिल रोजी मतदानाला सुरूवात झाली आहे. अशातच पश्चिम बंगालच्या कूच बिहारमधून हिंसाचाराची माहिती समोर येत आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये मतदानादरम्यान चंदमारी येथील बूथजवळ दगडफेक झाल्याचे वृत्त आहे.

माहितीनुसार, कूचबिहारमधील चांदमारी भागात दगडफेक झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन्ही बाजूचे लोक दगडफेक करताना दिसत आहेत. या दगडफेकीमुळे परिसरातील मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचार होऊ शकतो, असे भाजपाकडून यापूर्वी सांगण्यात येत होते. यामुळे कूच बिहारमधील हिंसाचारासाठी तृणमूल कॉंग्रेसने भाजपाला जबाबदार ठरवले आहे.

हे ही वाचा:

हेलिकॉप्टर दुर्घटनेत केनियाच्या संरक्षणप्रमुखासह नऊ जणांचा मृत्यू!

मोदींच्या तिसऱ्या पर्वात एक-दोन वर्षांत नक्षलवादाचा नायनाट करू

पट्टा-काठीने मारहाण, तोंडात फेव्हीकॉल, जखमांवर मीठ…महिलेवर अत्याचार, लव्ह जिहादचा संशय

इराणने जप्त केलेल्या इस्रायली जहाजावरील भारतीय डेक कॅडेट सुखरूप परतली मायदेशी

पीटीआयच्या मते, गुरुवार, १८ एप्रिल रोजी रात्री पश्चिम बंगालमध्येही हिंसाचार झाला, जेव्हा दोन टीएमसी कार्यकर्त्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. कूचबिहारमध्ये झालेल्या या हल्ल्यात टीएमसीचे दोन्ही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. उत्तर बंगालचे विकास मंत्री आणि टीएमसीचे दिनहाटा आमदार उदयन गुहा यांनी भाजपावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केला. ते म्हणाले, दोन्ही कार्यकर्ते दिनहाटा येथील बुथ कमिटी अध्यक्षांच्या घराकडे जात असताना त्यांना अडवून धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी टीएमसी कार्यकर्त्यांवरील हल्ल्यात सहभागी नसल्याचं म्हटलं आहे. बंगालमधील कूचबिहार, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वारमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. त्याचवेळी पोलिसांनी तत्परता दाखवत रात्रीपासूनच येथे मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा