30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरक्राईमनामाअयोध्येतील राम मंदिर तोडण्याची धमकी

अयोध्येतील राम मंदिर तोडण्याची धमकी

अल कायदा म्हणते , मस्जिद वही बनायेंगे

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरावर दशतवाद्यांची नजर आहे. गझवा-ए-हिंद या नियतकालिकाच्या ताज्या अंकात अयोध्येत उभे राहत असलेले राम मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अल कायदा राम मंदिर पाडेल आणि त्या जागी मशीद बांधेल अशी प्रतिज्ञा आंतरराष्ट्रीय जिहादी गटाने घेतली आहे. या मासिकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. जिहादला पाठिंबा देण्याचे आवाहन भारतीय मुस्लिमांना करण्यात आले आहे.

बाबरीच्या ढाच्यावर उभारण्यात येत असलेले राम मंदिर पाडण्यात येईल आणि मूर्तींच्या जागी अल्लाच्या नावावर बाबरी मशीद उभारली जाईल. या सर्वातून बलिदानाची अपेक्षा आहे. मासिकाचा मजकूर भारतीय वातावरणाशी परिचित असलेल्या व्यक्तीने लिहिल्याची व्यक्त करण्यात येत आहे. भौतिक नुकसानीला घाबरू नये असे आवाहन अल कायदाने भारतीय मुस्लिमांना उद्देशून केले आहे. त्यांनी आधीच आधीच अनेक दशकांपासून जीवित आणि मालमत्तेचे नुकसान केले आहे. जिहादसाठी ही जीवित आणि संपत्ती वापरली असती तर एवढी हानी झाली नसती असे या लेखात म्हटले आहे.

हे ही वाचा:

बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा

पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?

अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’

काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?

या सर्व गप्पा नाहीत. बाबरी मशीद ३० वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. २०वर्षांपूर्वी गुजरातमधील अहमदाबादमध्ये गर्भवती महिलांसह त्यांच्या मुलांचा शिरच्छेद करून त्यांना जाळण्यात आले आणि आज सर्वत्र बुलडोझर चालवले जात आहेत. जामिया मिलिया (इस्लामिया) आणि अलीगढपासून जामिया उस्मानिया (हैदराबाद उपनगर) आणि देवबंद  पर्यंत प्रत्येकासाठी हिंदू चाकू, भाले आणि तलवारी धारदार करत आहे असाही आरोप या लेखात करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा