34 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरदेश दुनियाअमेरिकन नागरिकांनी युद्धाला नाकारले!

अमेरिकन नागरिकांनी युद्धाला नाकारले!

मध्यावधी निवडणुकांच्या निकालावर इराणची प्रतिक्रिया

Google News Follow

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसमध्ये रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का दिला आहे. या निकालांवर इराणने प्रतिक्रिया दिली असून, अमेरिकन जनतेने युद्धाला नकार दिल्याचे म्हटले आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष आणि अमेरिकेसोबतच्या चर्चेतील प्रमुख वाटाघाटीकार मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अमेरिकन मतदारांनी ‘युद्ध नको’ असा संदेश दिल्याचे म्हटले आहे.

गालिबाफ यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, “विवेकबुद्धी असो किंवा वाढता जीवनावश्यक खर्च, अमेरिकन जनतेने युद्धाला नकार दिला आहे. आम्ही या संदेशाचे समर्थन करतो.” अमेरिकन सरकारने जनतेच्या इच्छेविरोधात जाऊन इतर देशांच्या दबावाखाली निर्णय घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

हे ही वाचा:

मध्यावधी निवडणुकात ट्रम्प यांनी गमावले अनेक बालेकिल्ले

ऍड. गौरी भिडेंकडून वडिलांच्या उपचारांसाठी मदतीचे आवाहन

प्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’ची २५ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

पंजाबमध्ये पश्चिम बंगालची पुनरावृत्ती होईल काय?

अमेरिकेतील या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेटमध्ये बहुमत मिळवले असून, प्रतिनिधीगृहातही रिपब्लिकन पक्षाची सत्ता उलथवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील धोरणांवर या निकालांच्या माध्यमातून मतदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे मानले जात आहे. वाढती महागाई, इंधनाचे दर आणि इराणसोबत सुरू असलेले युद्ध हे निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा