28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरदेश दुनियातिबेटमध्ये नेपाळ सीमेजवळ आणखी एक तलाव फुटला; पुन्हा महापुराचा धोका

तिबेटमध्ये नेपाळ सीमेजवळ आणखी एक तलाव फुटला; पुन्हा महापुराचा धोका

बालेन सरकारकडून इशारा; बचावकार्य थांबवले

Google News Follow

Related

नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण महापुरातून सावरण्याआधीच नेपाळसमोर नव्या महापुराचं संकट उभं राहिलं आहे. तिबेटच्या दिशेने तयार झालेला कृत्रिम तलाव फुटल्याची माहिती समोर आली असून, त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह नेपाळच्या दिशेने येत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने नेपाळ पोलिसांनी नदीकाठच्या भागांसह बचाव पथकांना सतर्क केलं असून, काही ठिकाणी बचावकार्य तात्पुरतं थांबवण्यात आलं आहे.

नेपाळ-चीन सीमेवरील जिरोंग परिसराच्या वरच्या भागात तयार झालेल्या नैसर्गिक अडथळ्यामुळे पाण्याचा साठा निर्माण झाला होता. हा अडथळा तुटल्यानंतर पाण्याचा वेगाने प्रवाह खालील दिशेने सुरू झाला. त्यामुळे नेपाळमधील भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नव्या पुराच्या धोक्यामुळे आपत्तीग्रस्त भागात तैनात असलेल्या सुरक्षा दलांना आणि बचाव पथकांना राहत आणि बचावकार्य थांबवून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रासुवा जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनाही सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलं आहे. याआधी आलेल्या महापुरामुळे रस्ते, पूल आणि वीज प्रकल्पांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पोहोचणं आधीच कठीण झालं असून, नव्या पुराच्या धोक्यामुळे बचावकार्य आणखी आव्हानात्मक बनलं आहे.

दरम्यान, नेपाळ-तिबेट सीमेवर २६ ऑगस्टला आलेल्या भीषण महापुरात नेपाळमध्ये ४६९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. चीनच्या तिबेट भागात आणखी तीन मृत्यू नोंदवण्यात आल्याने एकूण मृतांचा आकडा किमान ४७२ वर पोहोचला आहे. १,४०० हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत अनेक परदेशी नागरिकही बेपत्ता आहेत. भारतातील नागरिकांचाही मोठ्या संख्येने समावेश असून, विविध भागांत अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्रिशूली-१ जलविद्युत प्रकल्पातून ६३ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आठ सिमकार्ड पाकिस्तानात पाठवणारे दाम्पत्य अटकेत

फिर एक बार मोदी सरकार!

कॅनडाला डिवचलं? ट्रम्प यांनी लेक ऑन्टारिओचं नाव केलं ‘लेक अमेरिका’

नेपाळमध्ये महापुराचं थैमान; मृतांचा आकडा ४६९ वर

नेपाळमधील त्रिशूली-३ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात सुमारे १०० जण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळी लष्कराकडून हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भागातून आतापर्यंत सुमारे ३५० जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा