इस्रायलने लेबनॉनमधील आणखी एका मोठ्या शत्रूचा खात्मा केला आहे. आयडीएफने (इस्रायली संरक्षण दल) माहिती दिली आहे की, त्यांनी सीरियामधून इस्रायलविरोधात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणारा एक वरिष्ठ शस्त्रास्त्र विक्रेता हुसेन सैफो शरीफ याला ठार केले आहे. लेबनॉनमधील बालबेक प्रांतात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात शरीफ ठार झाला.
हुसेन सैफो शरीफच्या कारवाया इस्रायल आणि लेबनॉनमधील आंतरराष्ट्रीय करारांचे स्पष्ट उल्लंघन होतं, असेही आयडीएफने नमूद केले आहे.
हुसेन शरीफ कोण होता?
हुसेन सैफो शरीफ हा लेबनीज शस्त्रास्त्रांचा एक वरिष्ठ व्यापारी होता. त्याच्या नेटवर्कद्वारे सीरियामधून इस्रायलविरोधी दहशतवादी संघटनांना मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि संसाधने पुरवली जात होती. यामुळे इस्रायली क्षेत्रात हल्ले, हिंसाचार आणि अस्थिरता निर्माण झाली.
या नेटवर्कचे प्रमुख उद्दिष्ट इस्रायलविरुद्ध दहशतवादी कारवाया राबवणे आणि त्या वाढवण्यासाठी आवश्यक मदत पुरवणे हेच होते. या हेतूने, शरीफने सीरियामधून हमास आणि हिजबुल्ला सारख्या संघटनांना शस्त्रांचा पुरवठा सुनिश्चित केला आणि त्यांच्यासाठी आर्थिक आणि लॉजिस्टिक पाठबळ दिले. दरम्यान, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात तो ठार झाला आहे.
🔴ELIMINATED: Hussein Saifo Sharif, a senior weapons dealer in Lebanon who planned to advance terrorists attacks from Syria against Israel, was struck and eliminated in the area of Baalbek in Lebanon.
Sharif’s activities constitute a blatant violation of the understandings… pic.twitter.com/JVW7RMnFr2
— Israel Defense Forces (@IDF) September 18, 2025







