29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनियाअभिमानास्पद... भारतीय वंशाचे वकील अरुण सुब्रमण्यम दक्षिण आशियाचे पहिले न्यायाधीश

अभिमानास्पद… भारतीय वंशाचे वकील अरुण सुब्रमण्यम दक्षिण आशियाचे पहिले न्यायाधीश

Google News Follow

Related

भारतीय वंशाचे वकील अरुण सुब्रमण्यम यांची न्यूयॉर्कचे जिल्हा न्यायाधीश म्हणून राष्ट्रपती जो बायडेन यांनी निवड केली आहे. वकील अरुण सुब्रमण्यम हे दक्षिण आशियातील पहिले भारतीय न्यायाधीश असतील. राष्ट्रपती जो बायडेन यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केला. जो बायडेन यांचा हा निर्णय तमाम भारतीयांची मान उंचावणारा आहे. या खंडपीठावर काम करणारे सुब्रमण्यम पहिले दक्षिण आशियाई न्यायाधीश ठरले आहेत. सिनेट न्यायिक समितीने याला दुजोरा दिला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने अरुण सुब्रमण्यम यांची न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला होता.

अमेरिकेने ५८-३७ मतांनी अ‍ॅटर्नीकडून सुब्रमण्यन यांच्या नामांकनावर शिक्कामोर्तब केले. सुब्रमण्यम हे न्यूयॉर्कमधील सुसमॅन गॉडफ्रे एलएलपीचे भागीदार देखील आहेत. सुब्रमण्यम २०७पासून येथे कार्यरत आहेत. २००६ आणि २००७ पर्यंत त्यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जस्टिस रुथ बॅडर गिन्सबर्गसाठी क्लर्क म्हणून काम केले आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी २००५ ते २००६ या कालावधीत न्यू यॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्यासाठी राज्य जिल्हा न्यायालयात अमेरिकेचे न्यायाधीश ई. लिंच यांच्यासाठी काम केले आहे.

सुब्रमण्यम यांचा जन्म १९७९ मध्ये पेनसिल्व्हेनियातील पिट्सबर्ग येथे झाला. त्याचे आई-वडील १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्याचे वडील अनेक कंपन्यांमध्ये ‘कंट्रोल सिस्टीम इंजिनीअर’ म्हणून काम करत होते आणि आईही काम करत होती. २००१ मध्ये केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीमधून त्यांनी कॉम्प्युटर सायन्स आणि इंग्रजीमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली.

हे ही वाचा:

सुरक्षा दलांनी मोठा कट उधळून लावला, बारामुल्लामध्ये २ दहशतवाद्यांना अटक

‘वूमन सपोर्टींग वूमन’

विधानसभेत आज होणार ‘महिला लक्षवेधी’

आफताब हा प्रशिक्षित शेफ असल्याने त्याला मांस कसे साठवतात ते ठाऊक होते!

सुब्रमण्यन यांनी २००४ मध्ये कोलंबिया लॉ स्कूलमधून जेडीची पदवी घेतली. नॅशनल एशियन पॅसिफिक अमेरिकन बार असोसिएशनने सुब्रमण्यन यांचे त्यांच्या नामांकनाबद्दल अभिनंदन केले आहे. सुब्रमण्यन हे निस्वार्थ सेवेने काम करणारे अनुभवी वकील असल्याची प्रतिक्रिया असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष ए. बी क्रुझ यांनी व्यक्त केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा