32 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
घरदेश दुनियाअश्रफ घनी 'या' देशात पळाले

अश्रफ घनी ‘या’ देशात पळाले

Google News Follow

Related

अफगाणिस्तानात तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. संयुक्त अरब अमीरात (यूएई) च्या विदेश मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यूएईच्या विदेश मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, मानवतेच्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्रय दिला आहे. दरम्यान, अशरफ घनी आणि त्यांचे कुटुंबिय अबू धाबीमध्ये नक्की कोणत्या भागांत आहेत, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

संयुक्त अरब अमीरात (यूएई) नं म्हटलं आहे की, त्यांनी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना मानवतेच्या दृष्टिकोनातून स्विकारलं असून त्यांना आश्रय दिला आहे.

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला. त्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलवर कब्जा मिळवला आहे. देश सोडल्यानंतर आता अशरफ गनी यांनी स्वतः खुलासा केला आहे. या खुलासात त्यांना अफगाणिस्तान का सोडावं लागलं हे फेसबूकवर पोस्ट करत सांगितलं आहे.

अशरफ गनी यांनी रविवारी म्हटलं होतं की, “अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबाननं प्रवेश केल्यानंतर आपण होणाऱ्या रक्तपातापासून वाचण्यासाठी देश सोडला. आपल्या फेसबूक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये गनी म्हणाले की, एका कठिण निर्णयाचा सामना करावा लागला. ज्यात २० वर्षांच्या युद्धानंतर लाखो काबूल रहिवाशांचे भवितव्य आणि शहराची सुरक्षा धोक्यात आली होती. ज्यात अगोदरच असंख्य लोक मारले गेले होते.

हे ही वाचा:

तालिबानने कब्जा केल्यामुळे भारतातला सुकामेवा महाग होणार?

शिवसेनेचे नारायण राणेंविरोधात सुडाचे राजकारण

काश्मिरला बसला भूकंपाचा धक्का

राज्यातील नराधमांना आळा घालायला ठाकरे सरकार अपयशी

रक्तपातापासून वाचण्यासाठी मी विचार केला की, देश सोडणं हा एकमेव पर्याय असेल. तालिबानी जे नंतर काबूलमधील राष्ट्रपती भवनात घुसले. तालिबान आता एक ऐतिहासिक परीक्षेचा सामना करत आहे. तालिबाननं तलवार आणि बंदूकीच्या निर्णयात विजय मिळवला. आता आमच्या देशबांधवांचा सन्मान, समृद्धी आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. आता तेच अफगाणिस्तानचं नाव आणि सन्मान वाचवतील.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा