31 C
Mumbai
Sunday, March 29, 2026
घरदेश दुनियाघराणेशाही संपुष्टात आणत नेपाळमध्ये बालेन शाह यांनी पंतप्रधान पदाची घेतली शपथ

घराणेशाही संपुष्टात आणत नेपाळमध्ये बालेन शाह यांनी पंतप्रधान पदाची घेतली शपथ

रॅपर- राजकारणी बालेन शाह ठरले नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान

Google News Follow

Related

नेपाळमधील काठमांडूचे माजी महापौर आणि रॅपर- राजकारणी अशी ओळख असलेले बालेन शाह (बलेंद्र शाह) यांनी नेपाळचे ४० वे पंतप्रधान आणि देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ३५ वर्षीय बालेन यांनी आपल्या पक्षाला प्रचंड विजय मिळवून दिला आणि नेपाळमधील दीर्घकाळ चाललेल्या राजकीय घराण्यांचे व पारंपरिक पक्षांचे वर्चस्व संपुष्टात आणले. गुरुवारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे (आरएसपी) संसदीय नेते म्हणून बालेन शाह यांची निवड झाल्यानंतर ही घडामोड घडली.

संसदीय पक्षाच्या बैठकीत बालेन यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली, त्यामुळे ते देशाच्या सर्वोच्च कार्यकारी पदासाठी औपचारिकपणे पात्र ठरले आहेत, असे आरएसपीच्या केंद्रीय संघटन समितीचे सचिव शंकर श्रेष्ठ यांनी सांगितले. आरएसपीच्या केंद्रीय समितीने शाह यांना त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे अधिकारही दिले आहेत, असे श्रेष्ठ यांनी सांगितले. नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांची घोषणा संध्याकाळी होण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला, बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील आरएसपीने प्रतिनिधी सभेच्या (HoR) २७५ पैकी १८२ जागा मिळवून संसदीय निवडणुकीत मोठा विजय मिळवला. घराणेशाही आणि भ्रष्टाचारमुक्त शासनाची मागणी करणाऱ्या गेल्या वर्षीच्या हिंसक ‘जनरेशन झेड’च्या आंदोलनानंतरच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी पारंपरिक पक्षांचा पराभव केला. बालेन शाह यांनी, नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचा (युनायटेड मार्क्सवादी-लेनिनवादी) दीर्घकाळचा बालेकिल्ला असलेल्या झापा- ५ मतदारसंघात, चार वेळा पंतप्रधान राहिलेले केपी शर्मा ओली यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

हे ही वाचा:

कल्की, पठाणला मागे टाकत ‘धुरंधर २’चा १,००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश!

नक्षलवाद संपवण्यासाठी ३१ मार्च २०२६ ची अंतिम मुदत! नक्षलविरोधी कारवाईची काय आहे परिस्थिती?

अयोध्येत रामनवमी निमित्त शरयू घाटावर हजारो भक्तांनी घेतली पवित्र डुबकी

इराणच्या हल्ल्यांमुळे अमेरिकेचे १३ लष्करी तळ उध्वस्त; सैनिकांचा हॉटेल्स, कार्यालयांमध्ये आश्रय

मतदान संपल्यानंतर तीन आठवड्यांनी, सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांनी संघीय संसद भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली, ज्यामुळे सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सभागृहाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य, ७८ वर्षीय अर्जुन नरसिंह केसी यांनी सिंह दरबार येथील संघीय संसद सचिवालयात नवनिर्वाचित खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर, शीतल निवास (राष्ट्रपती निवास) येथे शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. १५ ते १८ सदस्यांचे मंत्रिमंडळ स्थापन करण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा