25 C
Mumbai
Sunday, January 4, 2026
घरक्राईमनामाबांगलादेश: चाकूने वार करून जाळलेल्या हिंदू व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

बांगलादेश: चाकूने वार करून जाळलेल्या हिंदू व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कुटुंबियांकडून न्यायाची मागणी

Google News Follow

Related

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक विशेषतः हिंदुंवर होणारे हल्ले थांबले नसून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एका हिंदू व्यावसायिकाला जमावाने मारहाण करून, चाकूने वार केले होते. खोकन चंद्र असे त्यांचे नाव असून इतकेच नव्हे तर त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला होता. तलावात उडी मारल्याने ते बचावले होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना गंभीर दुखापत झाली होती. मात्र, आता उपचारादरम्यान खोकन चंद्र यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

हिंदू व्यापारी खोकन चंद्र दास यांचे शनिवार, ३ जानेवारी रोजी सकाळी ढाका येथील नॅशनल बर्न इन्स्टिट्यूटमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. “शरियतपूरच्या दामुड्या उपजिल्हा येथे आगीमध्ये जखमी झालेले खोकन दास यांचे आज सकाळी ७:२० वाजता बांगलादेशातील नॅशनल बर्न इन्स्टिट्यूटमध्ये निधन झाले,” असे नॅशनल बर्न इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक डॉ. शाओन बिन रहमान यांनी सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की दास यांच्या शरीराचा सुमारे ३० टक्के भाग जळाला होता, त्यांच्या चेहऱ्यावर आणि श्वसनमार्गावर गंभीर जखमा होत्या.

नव वर्षाच्या पूर्वसंध्येला हा क्रूर हल्ला झाला होता जेव्हा ४० वर्षीय खोकन हे केउरभंगा बाजारातील त्यांचे औषध दुकान बंद करून घरी परतत होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेव्हा ते तिलोई परिसरात पोहोचले तेव्हा काही गुंडांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी अनेक वार केले, त्यानंतर शरीरावर पेट्रोल ओतले आणि त्यांना पेटवून दिले. यादरम्यान खोकन यांनी जवळच्या तलावात उडी मारली यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते.

खोकन दास यांचे पुतणे प्रांतो दास यांनी सांगितले की, कुटुंब या हत्येची योग्य चौकशी आणि न्यायाची मागणी करत आहे. त्यांनी सांगितले की, कोणत्याही गुन्हेगारांना पळून जाऊ देऊ नये आणि ज्यांची ओळख पटली आहे त्यांना विलंब न करता अटक करावी. बांगलादेशमध्ये हिंदू समुदायाच्या सदस्यांवरील हिंसाचाराच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही हत्या करण्यात आली आहे.

हेही वाचा :

न्यूज डंकाचे उपसंपादक आर. एन. सिंह यांचा ‘पूर्वांचल गौरव सन्मानाने’ गौरव

नस्लवादाविरोधात ख्वाजाच्या भूमिकेला पाठिंबा

हार्दिक पांड्याचा राजकोटमध्ये वादळी शतक

छत्तीसगडच्या सुकमा, बीजापूरमध्ये १४ नक्षलवादी मारले!

गेल्या महिन्यात, मैमनसिंगमधील कपड्याच्या कारखान्यातील कामगार दीपू चंद्र दास यांना ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने मारहाण करून ठार मारले होते, तर आणखी एका हिंदू तरुण अमृत मोंडल यांची खंडणीच्या आरोपावरून राजबाडी येथे मारहाण करून हत्या करण्यात आली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा