बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने सत्तेत आल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ताज्या बातमीनुसार, येथील मध्यवर्ती बँकेने रविवार (१ जून) नवीन चलनी नोटा जारी केल्या आहेत. या नवीन चलनी नोटांमध्ये, पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील आणि संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो काढून टाकण्यात आला आहे. छापलेल्या नवीन नोटांमध्ये बांगलादेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, नैसर्गिक दृश्ये आणि पारंपारिक ठिकाणे दर्शविली आहेत.
आतापर्यंत बांगलादेशच्या सर्व नोटांवर शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो छापला जात होता, ज्यांनी १९७१ मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केले होते. मात्र, इथून पुढे नव्या नोटांवर त्यांचा फोटो दिसणार नाहीये. बांगलादेशच्या सेंट्रल बँकेने माहिती देताना सांगितले की, आता नवीन नोटांवर कोणत्याही माणसाचे चित्र असणार नाही. यासोबतच, शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र असलेल्या जुन्या नोटा आणि नाणी देखील चलनात राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे. बँकेने जारी केलेल्या नवीन नोटांवर हिंदू आणि बौद्ध मंदिरांचे चित्र असणार आहेत.
बांगलादेशच्या सेंट्रल बँकेने जारी केलेल्या नवीन नोटा नऊ वेगवेगळ्या मूल्यांच्या आहेत. यानंतर, उर्वरित नोटा टप्प्याटप्प्याने चलनात आणल्या जातील. एका बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या या नोटा फक्त सेंट्रल बँकेकडूनच जारी केल्या आहेत. येत्या काळात, या सर्व नवीन नोटा इतर बँकांमधूनही जारी केल्या जातील.
हे ही वाचा :
सिक्कीममधील लष्करी छावणीत भूस्खलन, ३ जणांचा मृत्यू, ९ सैनिक बेपत्ता!
काँग्रेसने ६५ वर्षे भारताला अघोषित गुलाम बनवले, खरगेंनी उत्तर द्यावे!
महाराष्ट्र एटीएसची ठाण्याच्या पडघामध्ये धाड!
महाराष्ट्राचे ईलेक्ट्रिक वाहन धोरण एक महत्त्वाचे पाऊल!
दरम्यान, बांगलादेशने आपले चलन बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. नोटांमध्ये पहिला बदल १९७२ मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी नोटांवर देशाचा नकाशा छापला जात असे. त्यानंतर नव्या नोटांवर अवामी लीग नेते शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो छापला जात असे. अवामी लीग सरकारच्या काळात हे अनेकदा घडले आहे. यासह जेव्हा-जेव्हा खालिदा झीया यांची बीएनपी बांगलादेशात सत्तेत आली तेव्हा त्यांनी नोटांवर ऐतिहासिक स्मारकांना स्थान दिले.







