‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक भाषणांवर भाष्य करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना ‘स्वतःची प्रशंसा करण्याऐवजी शत्रूवर लक्ष केंद्रित करण्याचे’ आणि निवडणूक प्रचारापासून स्वतःला दूर ठेवण्याचे आवाहन केले होते. बेंगळुरूमध्ये पत्रकारांना संबोधित करताना खरगे बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे यांच्या आवाहनावर बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मल्लिकार्जुन खरगे पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचे जयस्वाल यांनी म्हटले आहे.
एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, मल्लिकार्जुन खरगे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. पंतप्रधान मोदी देशाच्या सुरक्षेचा आणि विकासाचा विचार करत आहेत, तर खरगे यांना त्याची काळजी का?. पंतप्रधान केवळ दुश्मन आणि सीमेवर चर्चा करू शकत नाही तर संपूर्ण जगाला मुठीत आणण्यासाठी ते बोलू शकतात.
पंतप्रधान मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेता आहेत. आजच्या जगात भारत एक नवा भारत म्हणून उदयास येत आहे. या लोकांनी (काँग्रेस) ६५ वर्षे भारताला अघोषित गुलाम बनवून ठेवले होते. काश्मीरमध्ये आतंकवाद आणि तरुणांद्वारे दगड फेक केली जात होती. याच देशात दोन झेंडे, दोन विधान, दोन चिन्हे चालत होती, या अशा गोष्टींवर खरगे यांनी उत्तर दिले पाहिजे, असे दिलीप जयस्वाल म्हणाले.
हे ही वाचा :
महाराष्ट्र एटीएसची ठाण्याच्या पडघामध्ये धाड!
महाराष्ट्राचे ईलेक्ट्रिक वाहन धोरण एक महत्त्वाचे पाऊल!
पॅरिसमध्ये आगीच्या ज्वाळा, लुटालूट, तोडफोड!
भद्रासन – पोटाचे दुखणे आणि गुडघ्याच्या वेदनेवर औषध
दरम्यान, खरगे यांनी पंतप्रधानांच्या अलीकडील सार्वजनिक विधानांवर आणि राजकीय हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पंतप्रधान मोदींनी निवडणूक प्रचारापासून तात्पुरते दूर राहावे असे सुचवले. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी निवडणुकीपासून दूर राहून देशावर लक्ष केंद्रित करावे. देशात जे काही घडले आहे ते समजून घ्यावे आणि नंतर बोलावे.”
#WATCH | Patna | On Congress National President Mallikarjun Kharge’s statement, Bihar BJP President Dilip Jaiswal says, "Mallikarjun Kharge is speaking Pakistan's language. Why is he worried that the PM is thinking about both the country's security and its development? The PM's… pic.twitter.com/Va5KfDMW90
— ANI (@ANI) June 2, 2025
