28.8 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरदेश दुनियाबांगलादेशात समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टला भीषण आग

बांगलादेशात समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टला भीषण आग

१० जणांचा मृत्यू

Google News Follow

बांगलादेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कॉक्स बाजारमध्ये एका रिसॉर्टला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश असल्याने या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी इनानी परिसरातील टुपटुप रेस्टो अँड रिसॉर्टमध्ये ही आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की रिसॉर्टमध्ये उपस्थित असलेल्या पर्यटकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, रिसॉर्टची इमारत लाकूड आणि बांबूपासून उभारण्यात आली होती. त्यामुळे आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने संपूर्ण परिसराला वेढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांना मोठे प्रयत्न करावे लागले. रिसॉर्टमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे ही वाचा:
देशविरोधी शक्तींना ओडिसाच्या विद्यार्थ्यांनी दिले चोख उत्तर

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजावर हल्ला

दिव्यांगांच्या स्वप्नांना बळ देणारे ‘मिट्टी कॅफे’

निमलष्करी महिला जवानाला कॉक्रोच आंदोलकाने थप्पड मारली
या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे रिसॉर्टच्या अग्निसुरक्षेवर यापूर्वीच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. संबंधित अग्निशमन विभागाने जून महिन्यात रिसॉर्टची तपासणी केली होती. त्यावेळी अग्निसुरक्षेतील त्रुटी निदर्शनास आणून देत व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली होती. तसेच, आवश्यक अग्निसुरक्षा परवान्याबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. असे असतानाही रिसॉर्टचे कामकाज सुरू राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाले का आणि संभाव्य धोका लक्षात आल्यानंतरही आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणामुळे आग लागली का, याचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेने पर्यटनस्थळांवरील हॉटेल्स आणि रिसॉर्टच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक परवाने, अग्निशमन उपकरणे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि नियमित तपासणी यांची काटेकोर अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. कारण, सुरक्षेतील एखादी छोटीशी त्रुटीही अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. कॉक्स बाजारमधील ही दुर्घटना पर्यटन व्यवसायातील सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा