28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरराजकारणनिमलष्करी महिला जवानाला कॉक्रोच आंदोलकाने थप्पड मारली

निमलष्करी महिला जवानाला कॉक्रोच आंदोलकाने थप्पड मारली

दिल्ली पोलिसांनी व्हिडिओ जारी केला

Google News Follow

दिल्ली पोलिसांनी शनिवारी कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनादरम्यान एका निमलष्करी दलाच्या महिला पोलिसाला महिला आंदोलकाने थप्पड मारल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून पोलिसावर हात उचलल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. दिल्ली  पोलिसांवर कथित हल्ला झाल्याचा व्हिडिओ जारी केला आहे. हा प्रकार शुक्रवारी, १६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी पालिका बाजार परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस सूत्रांनी सीएनएन-न्यूज१८ला दिलेल्या माहितीनुसार, राजीव चौक मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक ६ जवळ एका महिलेने यूट्यूबर असल्याचे भासवत निमलष्करी दलाच्या एका जवानाला थप्पड मारली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनाच्या आडून अनेक पोलिस कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यात आले. या घटनेशी संबंधित विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील दृश्यांची तपासणी केली जात असून, हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या आंदोलक आणि यूट्यूबर्सची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे ही वाचा:

कुपवाड्यात नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवादी ठार

भारताच्या परकीय चलन साठ्यात ८.५८ अब्ज डॉलरची घट

भारत-न्यूझीलंड व्यापार कराराचा पहिला टप्पा २० ऑक्टोबरपासून

दिपकेला प्रतिबंधात्मक अटक; नेहा बोराची सुटका

सदर व्हीडिओत एक महिला आंदोलक निमलष्करी महिला जवानाला थप्पड लगावताना दिसत आहे. त्याआधी त्यांच्या काही शाब्दिक बाचाबाची झाली असावी. त्यावरून सदर आंदोलक ही संतापलेली आहे आणि ती त्या महिला जवानाच्या अंगावर जात तिला थप्पड लगावताना दिसते. या प्रकरणात संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्याची तयारी केली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सीजेपीने शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कनॉट प्लेस येथे ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चाचे आयोजन केले होते. सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार होता.

सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी आंदोलनासाठी अधिसूचित नसलेल्या जंतर-मंतर परिसरात प्रवेश करण्याचा कथित प्रयत्न केल्यानंतर त्यांना या आठवड्याच्या सुरुवातीला ताब्यात घेण्यात आले होते. विशेष सघन पुनरिक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेला विरोध आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यासाठी सीजेपी तसेच विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून स्वतंत्रपणे आंदोलने सुरू आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा