पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यानंतर भारतात परतले. या दौऱ्यात भारताने भूतानच्या १३व्या पंचवार्षिक योजनेसाठी आणि आर्थिक प्रोत्साहन कार्यक्रमासाठी संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. या भेटीत भारत आणि भूतानदरम्यान तीन महत्त्वाच्या करारांवर सहमती झाली.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने आसममधील हतिसार येथे स्थलांतरण तपासणी केंद्र (Immigration Check Post) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गेलेफू मार्गे गुंतवणूकदार आणि नागरिकांची हालचाल अधिक सोपी होईल.
दोन्ही देशांनी १२०० मेगावॅटच्या पुनात्सांगछू-I जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य धरण बांधकामाचे काम पुन्हा सुरू करण्यावर सहमती दर्शवली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो भारत–भूतान संयुक्तरित्या विकसित केलेला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ठरेल.
भारताकडून आर्थिक मदत
भारत सरकारने भूतानमधील ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी ४० अब्ज भारतीय रुपयांच्या सवलतीच्या कर्जाची घोषणा केली आहे. या प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी आणि भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या उपस्थितीत भगवान बुद्धांच्या पवित्र पिपराह अवशेषांच्या सान्निध्यात १०२० मेगावॅटच्या पुनात्सांगछू-II प्रकल्पाचे उद्घाटन झाले. हा प्रकल्प भूतानच्या वीज उत्पादन क्षमतेत सुमारे ४० टक्क्यांची वाढ करेल.
हे ही वाचा:
सेनेने दाखवली तत्परतेची अद्भुत झलक
निठारी हत्याकांडातला खुनी आहे तरी कोण? पंधेरनंतर सुरेंद्र कोलीही निर्दोष
भारतातील तरुणांची प्रतिभा अमेरिकेला हवीय! ट्रम्प यांचे H-1B व्हिसावर उत्तर
दिल्ली कार स्फोट चौकशीसाठी एनआयएकडून विशेष पथकाची स्थापना
भारताला वीज निर्यात सुरू
या प्रसंगी दोन्ही नेत्यांनी पुनात्सांगछू-II प्रकल्पातून भारताला वीज निर्यात सुरू झाल्याचे स्वागत केले.
ही भागीदारी भारत–भूतान मैत्रीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही देशांनी ऊर्जा भागीदारीवरील संयुक्त दृष्टीकोन (मार्च २०२४) अंमलात आणण्याबाबत चर्चा केली. तसेच सीमा पार संपर्क सुधारण्यासाठी एकात्मिक तपासणी नाके आणि पायाभूत सुविधा विस्ताराचे महत्त्व अधोरेखित केले. सप्टेंबर २०२५ मध्ये उभारण्यात येणाऱ्या गेलेफू–कोकराझार आणि समत्से–बानरहाट रेल्वे संपर्कांबाबतच्या एमओयूवर आधीच सह्या झाल्या असून, अंमलबजावणीसाठी प्रकल्प संचालन समिती स्थापन करण्यात आली आहे.
दोन्ही देशांनी STEM, फिनटेक आणि अवकाश क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास मान्यता दिली.
तसेच UPI प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्यावर काम सुरू आहे, ज्यामुळे भारतात येणाऱ्या भूतानी नागरिकांना QR कोड स्कॅन करून भारतीय मोबाईल अॅपद्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळेल.
सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध
भारत सरकारने राजगीरमध्ये रॉयल भूतान मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्याचे आणि वाराणसीत भूतानी मंदिर व अतिथिगृहासाठी जमीन देण्याचे जाहीर केले आहे.
तीन करारांवर स्वाक्षऱ्या
नवीन उर्जेच्या क्षेत्रात सहकार्य (Renewable Energy Cooperation)
आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात सहकार्य (Health & Medical Cooperation)
संस्थात्मक संबंध बांधणी (Institutional Linkages Development)







