31 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरदेश दुनिया... आणि काबूल पुन्हा हादरले; मशिदीबाहेर बॉम्बस्फोट!

… आणि काबूल पुन्हा हादरले; मशिदीबाहेर बॉम्बस्फोट!

Google News Follow

Related

ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाली  आणि तेव्हापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. याच दरम्यान, आज (३ ऑक्टोबर) राजधानी काबूलमधील एका मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ स्फोट झाला. तालिबानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कबूलच्या मशिदीबाहेर रविवारी झालेल्या स्फोटात अनेक नागरिक ठार झाले आहेत. काबूलमधील ईद गाह मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ हा स्फोट झाला, असे तालिबानचे प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद यांनी ट्विटरवरून सांगितले.

झबीहुल्ला मुजाहिद यांच्या आईचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या आईसाठी रविवारी दुपारी मशिदीत प्रार्थना सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुजाहिद यांनी शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रार्थना सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती नागरिकांना केली होती.

एएफपी न्यूज एजन्सीच्या पत्रकारांच्या मतानुसार राजधानीत दोन ठिकाणी बॉम्बस्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकायला मिळाला. घटनास्थळी रुग्णावाहिका दाखल झाली त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं.

जबीउल्लाह मुजाहिद हा तालिबान सरकारमध्ये सूचना आणि संस्कृती मंत्रालयाचे राज्यमंत्री आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार हा बॉम्ब स्फोट रविवारी दुपारी गर्दीच्या ठिकाणी घडवून आणला. दुपारी मशिदीच्या बाहेर अचानक बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी परिसरात मोठी गर्दी होती. त्यामुळे या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शेकडो लोक जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार या बॉम्बस्फोटानंतर मशिदीच्या परिसरात गोळीबारही झाला.

हे ही वाचा:

ठाण्यात पालिकेच्या कारभारालाच पडले मोठे भगदाड!

कोटी कोटी कर्जात बुडालेल्या एसटीसाठी कोटिंगचा अट्टहास

सोमवारपासून विद्या येई घमघम…

मुंबईतील मैदानांवर पुन्हा होणार क्रिकेटचा जल्लोष

हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही. पण हा हल्ला आयएसआय- के (ISIS-K Attacks) म्हणजे इस्लामिक स्टेट- खुरासान या दहशतवादी संघटनेने घडवून आणला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयएसआय ही तालिबानची कट्टर विरोधक मानली जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा