33 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरक्राईमनामापाकिस्तानच्या क्वेटामध्ये बॉम्बस्फोट; फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाजवळ गोळीबार

पाकिस्तानच्या क्वेटामध्ये बॉम्बस्फोट; फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाजवळ गोळीबार

घटनेत सहा जणांचा मृत्यू आणि १९ जण जखमी

Google News Follow

Related

पाकिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरला आहे. मंगळवारी अशांत अशा बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटा येथे मोठा बॉम्बस्फोट झाला. ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि १९ जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर गोळीबार झाल्याची माहिती आहे. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून आरोग्य सेवांसाठी आणीबाणी स्थिती असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मंगळवारी क्वेटा शहर एका शक्तिशाली स्फोटाने हादरले आणि त्यानंतर शहराच्या पूर्वेकडील फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) मुख्यालयाजवळ जोरदार गोळीबार झाला. यात किमान सहा जणांचा मृत्यू झाला आणि १९ जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मॉडेल टाउन आणि आसपासच्या परिसरात झालेल्या या स्फोटामुळे जवळपासच्या घरांच्या आणि व्यावसायिक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि त्यामुळे संवेदनशील परिसरात घबराट पसरली. त्यानंतर काही वेळातच परिसरात गोळीबाराचे आवाज ऐकू आले आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.

हे ही वाचा..

मौलाना तौकीर रझाच्या निकटवर्तीयांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोझर कारवाई?

पंतप्रधान मोदी संघ शताब्दी समारंभात होणार सहभागी!

रायपूरमध्ये ‘लव्ह जिहाद’ थीमवर आधारित गरबा!

“मुजाहिदीन आर्मी” स्थापन करण्याचा कट रचणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक!

पोलिसांनी या परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली आहे. बचाव पथके आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. जखमी आणि मृतांना क्वेटा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिथे आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली. बलुचिस्तानचे आरोग्य मंत्री बख्त मुहम्मद काकर आणि आरोग्य सचिव मुजीब-उर-रहमान यांच्या सूचनेनुसार बीएमसी हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटरमध्येही अशाच प्रकारचा इशारा देण्यात आला. प्रांतीय आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, सर्व सल्लागार, डॉक्टर, फार्मासिस्ट, परिचारिका आणि पॅरामेडिक्सना आपत्कालीन कर्तव्यावर येण्यास सांगण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा