26 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरदेश दुनियाचीनने अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून ऑर्डर घेणे केले बंद!

चीनने अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून ऑर्डर घेणे केले बंद!

चीनचे आपल्या विमान कंपन्यांना निर्देश

Google News Follow

Related

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमधून काही देशांची तात्पुरती सुटका झाली असली तरी याचा सर्वात जास्त फटका हा चीनला बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयातीवर १४५ टक्के इतका कर लादला आहे. तर चीननेही पलटवार करत गेल्या आठवड्याच्या शेवटी सर्व अमेरिकन उत्पादनांवर १२५ टक्के प्रत्युत्तरात्मक कर लादला. यामुळे अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे. यामुळे चीनने एक मोठा निर्णय घेत अमेरिकेला दणका दिला आहे.

व्यापार युद्धाच्या दरम्यान, चीनने मंगळवारी आपल्या विमान कंपन्यांना अमेरिकन बोईंग कंपनीकडून ऑर्डर न घेण्याचे निर्देश दिले आहेत. बीजिंगने अमेरिकन कंपन्यांकडून विमान यंत्र सामग्री आणि उपकरणांशी संबंधित कोणतीही खरेदी तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. उच्च दरांमुळे वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी बोईंग विमाने भाड्याने घेणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचा विचार चीन सरकार करत आहे. व्यापार युद्धादरम्यान, बोईंगच्या सुटे भाग आणि विमानांची किंमत चीनमध्ये जवळजवळ दुप्पट होईल, असे संबंधित अहवालात म्हटले आहे.

जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धात अमेरिकेची विमान कंपनी बोईंग अडचणीत आली आहे. जागतिक एरोस्पेस कंपनीनुसार, बोईंग विमाने ५० वर्षांहून अधिक काळ चीनच्या नागरी विमान वाहतूक प्रवासी आणि मालवाहतूक प्रणालीचा मुख्य आधार आहेत. बोईंग ही चीनच्या विमान उत्पादन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे, जिथे १०,००० हून अधिक बोईंग विमाने चीनमध्ये बनवलेल्या सुटे भागांसह उड्डाण करतात. व्यापार युद्ध कमी होण्याची चिन्हे दिसत नसताना, बोईंगच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेवर म्हणजेच चीनवर याचा परिणाम झाला आहे. अहवालानुसार, पुढील २० वर्षांत जागतिक विमान मागणीपैकी २० टक्के मागणी चीनमधून येईल. खरं तर, २०१८ मध्ये, बोईंगच्या विमानांपैकी जवळजवळ २५ टक्के चीनचा वाटा होता.

हे ही वाचा : 

डिजिटल अरेस्टप्रकरणी चार जणांच्या मुसक्या आवळल्या; ७.६७ कोटींची झालेली फसवणूक

मुर्शिदाबादेत मारल्या गेलेल्या दास यांच्या कुटुंबावर केला होता ५०० जणांनी हल्ला!

“वक्फ मालमत्ता तृणमूल नेत्यांच्या, म्हणूनच बंगालमध्ये हिंसाचार”

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी १२५ वर्षे जुन्या कराराचा वापर; काय आहे करार?

गेल्या आठवड्यात चीनने अमेरिकेतून चीनमध्ये येणाऱ्या वस्तूंवर १२५ टक्के प्रत्युत्तरात्मक शुल्क जाहीर केले. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने शनिवारी फोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना चीनसह इतर राष्ट्रांवर लादलेल्या परस्पर शुल्कातून सूट दिली. दरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग सध्या व्हिएतनाम, मलेशिया आणि कंबोडियासह आग्नेय आशियातील देशांच्या दौऱ्यावर आहेत. व्हिएतनाममध्ये, शी जिनपिंग यांनी चीन आणि व्हिएतनामला ‘एकतर्फी गुंडगिरी’ ला विरोध करण्याचे आणि जागतिक मुक्त व्यापार कायम ठेवण्याचे आवाहन केले. तर, ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना आरोप केला की, चीन अमेरिकेला कसे नुकसान पोहोचवायचे यावर लक्ष केंद्रित करत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा