पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या तपासात बांगलादेशी बदमाशांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे, असे तपास यंत्रणेने केंद्रीय गृह मंत्रालयाला सांगितले.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाला सांगण्यात आले की पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून झालेल्या व्यापक हिंसाचाराच्या प्राथमिक चौकशीत बांगलादेशी उपद्रवी लोकांचा सहभाग असल्याचे उघड झाले.
वक्फ कायद्यावरील निदर्शनांमध्ये मुर्शिदाबाद जिल्हा आणि दक्षिण २४ परगणा येथे अशांतता पसरली होती. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते. अशामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार घुसखोरांवर लक्ष ठेवण्यात अपयशी ठरल्याचे तपासात आढळून आले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये ८०,४८० पेक्षा जास्त वक्फ मालमत्ता आहेत, जी उत्तर प्रदेशातील २.२ लाख मालमत्तांनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मुस्लीम समुदायाच्या एका गटाला असे वाटते कि या कायद्यामार्फत सरकार त्यांची जमीन हिसकावून घेईल. मात्र, केंद्र सरकारने हे विधेयक गरीब मुस्लिमांच्या बाजूने असल्याचे म्हटले आहे आणि असे दावे फेटाळून लावले आहेत.
हे ही वाचा :
‘हिंदू देवतांमध्ये शक्ती असती तर आक्रमकांना शाप देत नष्ट केले असते!’
डिजिटल अरेस्टप्रकरणी चार जणांच्या मुसक्या आवळल्या; ७.६७ कोटींची झालेली फसवणूक
आयपीएलमध्ये चेक होतेय ‘बॅटची फिगर’!
दरम्यान, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सुती आणि समसेरगंज येथे वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्यानंतर अनेक दुकाने, वाहने जाळण्यात आली आणि स्थानिकांची घरे तोडण्यात आली. ११ एप्रिल रोजी मुस्लिम बहुल जिल्ह्यात अशांतता निर्माण झाल्यापासून मोठ्या संख्येने स्थानिक लोक या भागातून पळून गेले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत एकूण २१० लोकांना अटक करण्यात आली आहे आणि मुर्शिदाबादमधील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या मुर्शिदाबादमध्ये ६६ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे.