32 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरदेश दुनियाभारतातील पेटत्या चिता पाहून चीनला उकळ्या

भारतातील पेटत्या चिता पाहून चीनला उकळ्या

Google News Follow

Related

सोशल मीडियावरून भारतीयांचा संताप

चीनचा विकृत आणि कपटी चेहरा वेगवेगळ्या स्वरूपात समोर येत असतो. आता चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या सोशल अकाऊंटवरून भारतात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची खिल्ली उडविण्यात आल्यामुळे चीनचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटला आहे. चीनच्या या विकृतीवर सोशल मीडियातून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. भारतात जळत असलेल्या चिता आणि चीनचे अंतराळात रॉकेट सोडतानाचे छायाचित्र असा एकत्र फोटो टाकून भारतातील करोना संकटाची विकृत थट्टा उडविण्यात आली. सोशल मीडियावर या ट्विटला लोकांनी आपले लक्ष्य बनविल्यावर ते ट्विट रद्द करण्यात आल्याचे कळते.
एकीकडे भारताला मदत करण्यासाठी हात पुढे करत असल्याचे दाखविणारा चीन दुसरीकडे असे फोटो शेअर करून डिवचण्याचे कामही करत आहे. भारतात करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या चिता आणि चीन अंतराळात रॉकेट लाँच करत असल्याचे छायाचित्र एकत्र जोडून दोन देशात कसा फरक आहे, असे विकृत चित्रण करण्यात आले आहे.
हे अकाऊंट चीनची मायक्रो ब्लॉगिंग साइट वाईबोवर कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पॉलिटिकल अँड लीगल अफेअरचे अकाऊंट आहे. हे छायाचित्र शेअर झाल्यानंतर या पक्षावर जोरदार टीका झाली. त्यात फोटोखाली चीनमध्ये लागलेली आग आणि भारतात लागलेली आग अशा फोटोओळीही आहेत.
चीनच्या या कृतीवर सोशल मीडियात संताप व्यक्त केला गेला. चीनच्या असंवेदनशील वृत्तीवर टीका करण्यात आली. ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन यांचाही चेहरा यानिमित्ताने समोर आला. भारतासाठी आपल्याला मानवतेचा झेंडा हाती धरला पाहिजे असे विधान करताना त्यांनी चीनने भारताला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, व्हेंटिलेटर या वस्तू दिल्या तर त्या गरिबांसाठी देण्याऐवजी श्रीमंतांना वाचविण्यासाठी दिल्या जातील असा ट्विट करत विकृत विचारांचे दर्शन घडविले.

अतुल भातखळकरांची टीका

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून चीनच्या या विकृतीवर प्रहार केला.
भारतातील पेटत्या चितांवरून विकृत चीनने खिल्ली उडविली असून कम्युनिस्ट पार्टीची जगभर नाचक्की होत आहे. भारताचा द्वेष आणि विकृत मानसिकतेने बरबटलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाचे भारतातले छुपे आणि उघड साथीदार ही आपल्या देशाची खरी समस्या आहे, असे भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा