आंदोलनामुळे दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके बंद

सुरक्षेच्या कारणास्तव मोठा निर्णय

आंदोलनामुळे दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके बंद

दिल्लीत झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) एक मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, नवी दिल्ली आणि आसपासची १६ मेट्रो स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवाशांसाठी बंद करण्यात आली आहेत.

डीएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, ही १६ स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील आणि गाड्या तिथे थांबणार नाहीत. तथापि, प्रवाशांच्या सोयीसाठी, तीन इंटरचेंज स्थानकांवर मेट्रो लाईन बदलण्याची सुविधा खुली ठेवण्यात आली आहे.

प्रवासी राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट स्थानकांवर एका लाईनमधून दुसऱ्या लाईनमध्ये बदल करू शकतील, पण या स्थानकांवरून बाहेर पडण्यास किंवा आत येण्यास परवानगी दिली जाणार नाही.

बंद राहणाऱ्या १६ मेट्रो स्थानकांची यादी

१. लोक कल्याण मार्ग
२. राजीव चौक
३. पटेल चौक
४. रामकृष्ण आश्रम मार्ग
५. बाराखंबा रोड
६. सर्वोच्च न्यायालय
७. सेवा तीर्थ
८. जनपथ
९. मंडी हाऊस
१०. केंद्रीय सचिवालय
११. आयटीओ
१२. दिल्ली गेट
१३. इंद्रप्रस्थ
१४. खान मार्केट
१५. जोर बाग
१६. शिवाजी स्टेडियम

हे ही वाचा:

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान मोदींशी भेट

राहुल गांधींकडून विद्यार्थ्यांचा निर्लज्ज राजकीय वापर!

मोतीबिंदू आता वृद्धांपुरता मर्यादित नाही!

कोक्रॉच समर्थकांची पोलिसांवर दगडफेक, आरएएफ जवानालाही मारहाण

यापूर्वी, २० आणि २१ जुलै रोजी, कॉकरोच जनता पक्षाच्या संसद मोर्चामुळे डीएमआरसीने अनेक मेट्रो स्थानके बंद केली होती. पण, सुरक्षा आणि सोयीच्या कारणास्तव, कालांतराने त्या स्थानकांवरील सेवा पूर्ववत करण्यात आल्या होत्या.

Exit mobile version