22 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरदेश दुनियासरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल 'या' दहा गोष्टी माहिती आहेत का?

सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल ‘या’ दहा गोष्टी माहिती आहेत का?

सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे.

Google News Follow

Related

देशाचे कणखर व्यक्तिमत्व असलेले तसेच एकसंध राष्ट्र निर्मितीसाठी भरीव योगदान देणारे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज ७२ वी पुण्यतिथी आहे. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचाराच्या शांतिस्थापनेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्वाचे कार्य केले होते. मुत्सद्देगिरी आणि वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून त्यांनी संस्थाने भारतात विलीन केली. यामुळेच त्यांना भारतचे ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाते.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल दहा खास गोष्टी

  • सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमध्ये झाला. लंडनमध्ये त्यांनी बॅरिस्टरचे शिक्षण घेतले आणि देशात परत येऊन अहमदाबादमध्ये वकिली सुरू केली.
  • १९१८ साली सरदार पटेल यांनी खेडा लढ्यातील स्वातंत्र्य चळवळीत पहिले आणि मोठे योगदान दिले होते. पुढे १९२८ च्या बारडोली सत्याग्रहात त्यांनी शेतकरी चळवळीचे नेतृत्व केले.
  • बारडोली सत्याग्रह आंदोलनाच्या यशानंतर तेथील महिलांनी वल्लभभाई पटेल यांना ‘सरदार’ ही पदवी दिली होती.
  • लोहपुरुष सरदार पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते.
  • स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड भारत निर्माण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
  • त्यांनी लहान-मोठ्या ५६२ संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून भारतीय एकता निर्माण केली.
  • देशाला एकसंध ठेवण्यात भारतीय प्रशासकीय सेवा महत्त्वाची भूमिका बजावतील अशी सरदार पटेल यांची दृष्टी होती.

हे ही वाचा:

वन अविघ्न इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर अग्नितांडव

बंद घरात आढळला मिठात पुरलेला मृतदेह

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

  • सरदार पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे. गुजरातमधील नर्मदेच्या सरदार सरोवर धरणासमोर सरदार पटेल यांचा १८२ मीटर उंच लोखंडी पुतळा ( स्टॅच्यू ऑफ युनिटी ) बांधण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी हा पुतळा राष्ट्राला समर्पित करण्यात आला होता.
  • सरदार पटेल यांना देशाच्या एकात्मतेचा शिल्पकार म्हटले जाते. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस ‘एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
  • सरदार पटेल यांचे १५ डिसेंबर १९५० साली मुंबईमध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांना १९९१ मध्ये मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्यात आला.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा