25 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरक्राईमनामाबंद घरात आढळला मिठात पुरलेला मृतदेह

बंद घरात आढळला मिठात पुरलेला मृतदेह

औरंगाबादमध्ये नरबळीचा प्रकार घडला आहे

Google News Follow

Related

औरंगाबादमधून नरबळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका कुलूपबंद घरात मिठामध्ये पुरलेला मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहावर शाल टाकून शेंदूर लावलेले दोन दगड व काही लिंबू ठेवलेले होते. त्यामुळे, हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

औरंगाबादमधील वाळूजमधील समता कॉलनी कामगार वसाहतीमध्ये ही घटना घडली आहे. या वसाहतीमध्ये एका कुलूपबंद घरात मिठामध्ये पुरलेला मृतदेह आढळला आहे. ज्या घरामध्ये मृतदेह आढळला आहे. ते घर गेल्या तीन महिन्यांपासून बंद होते. भाडेकरू बाहेरगावी जातं असल्याचे सांगून घर बंद करून निघून गेले होते. मात्र, नवीन भाडेकरू आल्यामुळे घर मालकाने घराचे कुलूप तोडले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेहावर शाल टाकून शेंदूर लावलेले दोन दगड व काही लिंबू ठवलेले होते. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये एक कुटुंब या वसाहतीत राहण्यासाठी आले होते. काकासाहेब भुईगळ (वय ६०) यांच्यासह त्यांच्या दोन मुली आणि पत्नी असे चौघेजण या रूममध्ये भाड्याने राहत होते. भुईगळ हे पुजाअर्चा व मांत्रिकाचे काम करतं असत. तीन महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवादरम्यान सप्टेंबरमध्ये भाडेकरू भुईगळ यांनी कुटुंबासह गावाकडे जातं असल्याचे घरमालक शेळके यांना सांगितले. त्यानंतर खोलीला कुलूप लावून भुईगळ कुटुंबासह निघून गेले.

हे ही वाचा:

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती

१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!

तीन महिने फोन करून भुईगळ कुटुंब आले नाही, म्हणून घरमालकाने नवीन भाडेकरू पहिला. त्या भाडेकरूला घर दाखवण्यासाठी घरमालक शेळके यांनी नवीन खोली उघडली आणि हा प्रकार उघडकीस आला. शेळके यांनी घराची पाहाणी केली. त्यांनी स्वयंपाकघरातील ओट्याच्या खालील भागाची पाहणी केली, तेव्हा त्यांना खालचा अर्धा भाग सिमेंट व वाळूने बंद केल्याचे दिसून आले. त्यावर दोन शेंदूर लावलेले दगड व काही लिंबू ठेवलेले आढळले. त्यांनी सिमेंटने बंद केलेला भाग फावड्याने फोडला असता त्यात मिठामध्ये पुरलेला कपड्यांमध्ये गुंडाळलेला कुजलेला मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने ही माहिती वाळूज पोलिसांना दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा