30 C
Mumbai
Monday, May 18, 2026
घरक्राईमनामा१५५ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी आप नेते दीपक सिंगला अटकेत

१५५ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी आप नेते दीपक सिंगला अटकेत

ईडीची मोठी कारवाई

Google News Follow

Related

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवार, १८ मे रोजी आम आदमी पक्षाचे नेते दीपक सिंगला यांना अटक केली आहे. १५५ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने समर्थक जमले होते. ईडीचे पथक दीपक सिंगला यांना ताब्यात घेऊन बाहेर पडताच समर्थकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली.

ही संपूर्ण कारवाई महेश टिंबर प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित १५५ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात करण्यात आली आहे. या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे यापूर्वी अटक करण्यात आलेले पंजाबचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते संजीव अरोरा यांच्याशीही जोडले गेले आहेत. या नेटवर्कचा तपास करण्यासाठी ईडीने मोठ्या प्रमाणावर छापेमारी मोहीम राबवली.

सोमवारी सकाळी ईडीच्या पथकाने दिल्ली आणि गोवा यांसह सात वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. दीपक सिंगला, महेश सिंगला, अमरिक गिल आणि त्यांच्या संबंधित ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान एजन्सीला अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आणि डिजिटल पुरावे मिळाल्यानंतर दीपक सिंगला यांना ताब्यात घेण्यात आले.

हे ही वाचा:

सौदी अरेबियामध्ये ८,००० पाकिस्तानी सैनिक आणि विमाने तैनात

आता बंगाल सरकार इमाम, पुजाऱ्यांना पोसणार नाही!

तडजोड होणार? अमेरिकेच्या पाच अटींना इराणचे प्रत्युत्तर

एअर शोदरम्यान दोन अमेरिकन लढाऊ विमानांची टक्कर; वैमानिक थोडक्यात बचावले

ईडीच्या म्हणण्यानुसार, आरोपी कंपन्या आणि संबंधित व्यक्तींनी बनावट कागदपत्रे आणि चुकीची माहिती वापरून बँकांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले आणि त्या रकमेचा गैरवापर केला. हा पैसा नेमका कुठे वळवण्यात आला आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता सुरू आहे. माहितीनुसार, या घोटाळ्यात दीपक सिंगला यांचे नाव थेट समोर आले आहे. त्यांच्यासह महेश सिंगला आणि अमरिक गिल यांच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. ईडी सर्व बाजूंनी चौकशी करत असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा