29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामा१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!

१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!

ओशिवरा पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

फिल्म ऍक्टर धर्मेश व्यास यांची पासपोर्ट डिस्पॅच करण्याच्या नावाखाली १ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झालेली सर्व रक्कम अत्यंत कमी वेळेत परत मिळविण्याची कामगिरी ओशिवरा पोलीस ठाण्याने करून दाखविली.

दिनांक ७ डिसेंबर रोजी धर्मेश जयकिशोर व्यास वय ५९ वर्षे राहणार – 5/A/1406, न्यू महाडा लोखंडवाला अंधेरी पश्चिम मुंबई यांना त्यांचा मो. क्र.9892503600 वर मो. क्र. 9870176400/8976982882 धारकाने कॉल करून “आपका पासपोर्ट आ गया है लेकिन आपका डिस्पॅच करने का कोड ब्लॉक हुआ है l उसको अनब्लॉक करने के लिए आपको पाच रुपया भेजना पडेगा उसके बाद दो घंटे मे पासपोर्ट घर पहुँच जायेगा” असे सांगितले. तेव्हा तक्रारदार हे शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी समोरील व्यक्तीने दिलेल्या क्रमांकावर पाच रुपये पाठवले. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजता त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून एकूण ९९,९९९/- रु. वजा झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. तेव्हा त्यांनी तात्काळ त्यांच्या बँकेची संपर्क करून त्यांच्या खात्यातून वर नमूद रक्कम वजा झाल्याचे सांगितले. तेव्हा बँकेने त्यांच्याबरोबर ऑनलाइन फ्रॉड झाल्याचे सांगितले. तेव्हा तक्रार यांना त्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारदार हे त्यांची online फसवणूक केल्याबाबतची तक्रार घेऊन ते समक्ष पोलीस ठाण्यास आले असता तात्काळ दखल घेण्यात आली.

हे ही वाचा:

ओटीपी शिवाय पैसे लुटण्याचे नवे तंत्र वापरले जाते का?

पश्चिम रेल्वेच्या सेवेत ‘यात्री ॲप’

लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्याला मरेपर्यंत तुरुंगवास

चीन आणि काँग्रेसच्या संबंधांवर अमित शहांनी तोफ डागली

 

ओशिवरा पो.ठाणेचे मा. व.पो.नि. धनावडे सो व पो. नि. सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सायबर अधिकारी पो उ नि दिगंबर कुरकुटे, HC 31474/अशोक कोंडे, PC 130165/विक्रम सरनोबत यांनी तात्काळ प्राप्त माहितीच्या आधारे व फिर्यादी यांच्या एचडीएफसी बँकेच्या मॅनेजर शी संपर्क करून झालेल्या ट्रांजेक्शन ची माहिती प्राप्त केली असता तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम ही IDFC Fast बँक मध्ये वळते झाल्याने तात्काळ IDFC Fast बँकेच्या नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करुन व ईमेलद्वारे पत्र व्यवहार करून तात्काळ फिर्यादी यांची फसवणूक झालेली सर्व रक्कम ९९,९९९९/-रु. फ्रीझ करण्यात यश मिळवले असून सदरची रक्कम फिर्यादी यांना रिफन्ड करण्याची बँकेमार्फत प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत ओशिवरा पोलीस ठाणे गुरक्र. 1576/22 कलम 419,420 भादविसह 66(क)(ड) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा