29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषचीन आणि काँग्रेसच्या संबंधांवर अमित शहांनी तोफ डागली

चीन आणि काँग्रेसच्या संबंधांवर अमित शहांनी तोफ डागली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

तवांगमध्ये सीमाभागात भारत आणि चिनी सैन्य आमनेसामने आले. याचं पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेस आणि चीनच्या संबंधांचा पाढाच लोकसभेत वाचून दाखवला आहे. तसेच कॉंग्रेसने जनतेसमोर दुटप्पीपणा करणं थांबवावं, असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे.

दोन्ही देशाच्या सैन्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आली. याचं पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत एक इंचही जमीन कोणी घेऊ शकणार नाही, असं विधान अमित शहा यांनी केले आहे.

अमित शहा यांनी सैनिकांच्या शौर्याचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, काँग्रेसने या प्रकरणाचं राजकारण करणं थांबवावं. आमच्या सैनिकांनी ज्या प्रकारे शौर्य दाखवलं आणि आमच्या मातृभूमीचं रक्षण केलं, त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो. काँग्रेसच्या काळात हजारो किलोमीटर जमीन आमच्याकडून चीनने बळकावली आहे. मात्र, सध्या भाजपाच सरकार आहे, त्यामुळे एक इंचही जमीन कोणीही घेऊ शकणार नाही,असंही त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात चीनने भारताची हजारो हेक्टर जमीन बळकावली होती. २००६ मध्ये काँग्रेसच्या काळात चिनी दूतावासाने संपूर्ण अरुणाचलवर दावा केला होता. त्याचवेळी चीनने काँग्रेसचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांना व्हिसा नाकारला. तर २००९ ला मनमोहन सिंग यांच्या अरुणाचल भेटीवर चीननं आक्षेप घेतला.

हे ही वाचा : 

अजबचं! कोण आधी फोटो काढणार? प्रश्नावरून लग्न मंडपात हाणामारी

पदयात्रेला ब्रेक देऊन राहुल गांधी परदेश यात्रेला जाणार?

नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा, म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक

पेरूमधील आंदोलकांनी विमानतळ घेतले ताब्यात ; पोलिस अधिकाऱ्यांना ठेवले ‘ओलीस’

२०११ मध्ये काँग्रेस सरकारनं चीनच्या धमक्यांमुळे डेंगचोकमध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांचे बांधकाम थांबवले. हे सर्व विषय जनतेला माहीत आहेत. जनता सगळं पाहत आहे. मोदीजी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत कोणी एक इंचही जमीन काबीज करू शकत नाही, असंही अमित शहांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा