27.5 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरक्राईमनामानरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा, म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक

नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा, म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक

राजा पटेरिया यांना त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली आहे.

Google News Follow

Related

काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मंत्री राजा पटेरिया यांना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या हत्येसाठी तयार रहा असं वक्तव्य त्यांनी केले होते.

राजा पटेरिया यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते जमलेल्या लोकांना मोदींविरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी निवडणूक संपवतील, धर्म, जात, भाषेच्या आधारे सर्वाचं विभाजन करतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांना धोका आहे. जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे, असं राजा म्हणाले. यानंतर त्यांनी हत्या म्हणजे पराभव असं सांगत सावरण्याचाही प्रयत्न केला.

त्यांच्या या आक्षेपार्ह विधानावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी राजा पटेरिया यांना मध्य प्रदेशातील दामोह येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली आहे.

राजा यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ भाजपा मध्य प्रदेशचे प्रवक्ते राजपाल सिसोदिया यांनी व्हायरल केला. प्रथम फेसबुकवर आणि नंतर ट्विटरवर टाकून त्यांनी हे विधान लोकांपर्यंत पोहोचविले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं असून, लोक संताप व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा:

काँग्रेसची गलिच्छ मानसिकता; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचे केले आवाहन

‘निर्भया फंडातून मिळालेल्या गाड्या सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, वडेट्टीवार यांनी वापरल्या’

एकनाथ शिंदे समृद्धीचे सिकंदर…

जी २० च्या पहिल्या विकास कार्यगटाची होणार मुंबईत बैठक

दरम्यान, रविवारी काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राजा पटेरिया त्या बैठकीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा