31 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरदेश दुनिया“भारताला लोकशाहीचे धडे देऊ नका”

“भारताला लोकशाहीचे धडे देऊ नका”

मेलोनी यांच्या पक्षाच्या नेत्या बर्गामिनी यांचा इटालियन नेत्याला टोला

Google News Follow

भारतातील लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता इटलीतील नेत्यांचीही उडी पडली आहे. काँग्रेसने हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या ‘भारत समिट २०२६’मध्ये इटलीच्या समाजवादी पक्षाचे नेते जियाकोमो फिलिबेक यांनी भाजपविरोधात ‘व्होट चोर, गद्दी छोड’ अशी घोषणा दिली होती. त्यांच्या वक्तव्यावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आघाडीतील फोर्झा इटालिया पक्षाच्या नेत्या डेबोरा बर्गामिनी यांनी आक्षेप घेतला आहे. भारतासारख्या मित्रदेशाला युरोपने लोकशाहीचे धडे देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बर्गामिनी यांनी फेसबुक पोस्टद्वारे फिलिबेक यांच्या वक्तव्यावर टीका केली. भारताच्या अंतर्गत राजकीय चर्चेत परदेशी नेत्यांनी हस्तक्षेप करणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतात ९७ कोटी मतदार मतदान करण्यास सक्षम असून, देशाकडे स्वतःच्या राजकीय संस्था आणि न्यायव्यवस्था आहे. कोणताही वाद लोकशाहीच्या नियमांनुसार सोडवला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. भारत आणि इटली यांच्यात विशेष सामरिक भागीदारी असल्याने मित्रदेशाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप टाळला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

काय म्हणाले होते फिलिबेक?

‘भारत समिट २०२६’मध्ये बोलताना फिलिबेक यांनी भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचा दावा केला होता. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा देत त्यांनी ‘व्होट चोर, गद्दी छोड’ ही घोषणा दिली. मतदारयाद्या पारदर्शक आणि स्वच्छ असाव्यात, यासाठी राहुल गांधींची मोहीम महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

हे ही वाचा:

‘ऑपरेशन सिंदूर’मधून स्वदेशी शस्त्रांची ताकद सिद्ध!

‘रामायण’ बॉक्स ऑफिस कमाईत १,४०० कोटींच्या उंबरठ्यावर

अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यावरील गोळीबाराचा कट उधळला

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन?

फिलिबेक यांच्या वक्तव्यावर भाजपने टीका केली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी परदेशी नेत्याकडून भारताचा अपमान होत असताना काँग्रेस नेते टाळ्या वाजवत असल्याचा आरोप केला. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही राहुल गांधी परदेशी नेत्यांच्या मदतीने मोदी सरकारविरोधात वातावरण तयार करत असल्याचे म्हटले. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी फिलिबेक यांची बाजू घेतली. मोदी यांनी मेलोनी यांना चॉकलेट दिले असेल, तर इटलीच्या नेत्याने भारतात येऊन लोकशाहीवर मत व्यक्त करण्यात गैर काय, असा सवाल त्यांनी केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा