28 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरविशेष‘रामायण’ बॉक्स ऑफिस कमाईत १,४०० कोटींच्या उंबरठ्यावर

‘रामायण’ बॉक्स ऑफिस कमाईत १,४०० कोटींच्या उंबरठ्यावर

११ दिवसांत भारतात ७६० कोटींचा गल्ला

Google News Follow

अभिनेता रणबीर कपूर आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या ११ दिवसांत या चित्रपटाने जगभरात १,३८४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपट लवकरच १,४०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपटाच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे.

५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दुसऱ्या रविवारपर्यंत भारतात ७६०.६० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. अकराव्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दहाव्या दिवशीच्या ७२.९० कोटी रुपयांच्या तुलनेत कमाईत २.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाने भारतात १९६ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली.

जगभरातील एकूण कमाईमध्ये भारतातील ९०९ कोटी रुपयांच्या ग्रॉस कलेक्शनचा, तर परदेशातील ४७५.५० कोटी रुपयांच्या कमाईचा समावेश आहे. चित्रपटाच्या एकूण जागतिक कमाईत परदेशातील बाजारपेठांचा वाटा ३४.३ टक्के आहे.

हे ही वाचा:

अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यावरील गोळीबाराचा कट उधळला

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन?

भूपेश बघेल यांच्या मुलाच्या ३५५ भूखंडांवर ईडीचा ताबा

अर्शदीप-सिराज, अक्षरच्या गोलंदाजीमुळे भारताने मालिका जिंकली

हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई

भाषानिहाय कमाईचा विचार करता हिंदी आवृत्तीने आघाडी कायम ठेवली आहे. अकरा दिवसांत हिंदी आवृत्तीने ५८२.२५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. त्यानंतर कन्नड आवृत्तीने ६३.१० कोटी, तेलुगूने ४९.४० कोटी, तमिळने ३४.४० कोटी आणि मल्याळम आवृत्तीने ३१.४५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा