28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरदेश दुनियाआता इंग्लंडलाही पाकिस्तान नकोसा!

आता इंग्लंडलाही पाकिस्तान नकोसा!

Related

आगामी मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास इंग्लंडचा नकार

सुरक्षेचे कारण देत न्यूझीलंडने पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यानंतर आता इंग्लंडनेही आगामी मालिकेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. तब्बल १६ वर्षांनी इंग्लंडचा संघ पाकिस्तानला जाणार होता.

इंग्लंडच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या दौऱ्याला सुरुवात होण्यासाठी २० मिनिटे राहिलेली असताना दौरा रद्द केला होता. न्यूझीलंडने सुरक्षेचे कारण देत दौरा रद्द केला होता. त्यानंतर इंग्लंड क्रिकेटनेही हा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, ‘खेळाडूं आणि सपोर्ट स्टाफचे मानसिक आणि शाररिक आरोग्य याला आमच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा प्रवास धोक्याचाच आहे. त्यात त्या भागात दौऱ्यासाठी गेल्यास खेळाडूंवर ताण वाढेल. कोरोनासंदर्भातील नियम आणि तणावामुळे आगामी टी-२० विश्वचषकासाठी खेळणार असलेल्या आमच्या संघावरही याचा परिणाम होण्याची भीती असल्यामुळे आम्ही हा निर्णय़ घेत आहोत.’

इंग्लंड क्रिकेट टीम ऑक्टोबरमध्ये दोन टी-२० सामने खेळण्याकरता पाकिस्तानमध्ये येणार होती. १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी हे सामने खेळवले जाणार होते. सोबतच इंग्लंडची महिला क्रिकेट टीमही यावेळी दोन टी-२० आणि तीन वनडे सामने खेळण्यासाठी येणार होती. पण या दोन्ही संघाचे हे आगामी दौरे रद्द झाल्यांच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केलं आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने हे स्पष्ट केलं आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा दौराही धोक्यात

न्यूझीलंड दौरा रद्द झाल्याने इंग्लंडच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मागील बराच काळापासून आशा असणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं भविष्यही धोक्यात आलं आहे. या दौऱ्यात कसोटी, वनडे आणि टी-२० असे सामने खेळवण्यात येणार होते. ही मालिका फेब्रुवारी, मार्च २०२२ दरम्यान खेळवली जाणार होती. ऑस्ट्रेलिया संघ जवळपास  २४ वर्षांपासून पाकिस्तान दौऱ्यावर गेलेली नाही.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा