25 C
Mumbai
Thursday, December 18, 2025
घरक्राईमनामापाकिस्तानात दहशतवाद्यांकडून बसवर गोळीबार

पाकिस्तानात दहशतवाद्यांकडून बसवर गोळीबार

१० प्रवाशांचा मृत्यू

Google News Follow

Related

पाकिस्तानच्या गिलगिट- बाल्टिस्तान भागात गंभीर गोळीबाराची घटना घडली असून एका बसवर गोळीबार झाला. या भागातील काराकोरम हायवेर दहशतवाद्यांनी एका बसवर गोळीबार केल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यात कमीतकमी १० लोकांचा मृत्यू झाला असून इतर २५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

डायमेरचे डेप्युटी कमिशनर आरिफ अहमद यांनी ही घटना संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास चिलासच्या हुदुर भागात झाल्याचे सांगितले. दहशतवाद्यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसला लक्ष्य करत त्यावर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून येत असलेल्या ट्रकला धडकली.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये देशभरातील नागरिक प्रवास करत होते. तसेच मारले गेलेल्या नागरिकांमध्ये दोन सैनिकांचा देखील समावेश आहे. स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा एक सदस्य देखील जखमी झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार डायमरचे पोलिस अधीक्षक सरदार शहरयार यांनी सांगितलं की, घटनास्थळावर काराकोरम हायवेचे पोलीस अधिकारी पोहचले होते. त्यांनी सांगितलं की, मृतदेह आणि जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसपींनी सांगितलं की, घटनास्थळी असलेल्या इतर वाहनांना ताफ्याच्या स्वरूपात तेथून नेण्यात आले. पुरावे गोळा करण्यासाठी हल्ला झाला त्या ठिकाणाला वेढा घालण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांमध्ये महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे.

हे ही वाचा:

परदेशांतील प्रसारमाध्यमांकडूनही मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक

मोदींवरील विश्वासाचं हे यश!

तीन राज्यांत काँग्रेसचा चिखल, भाजपाचे कमळ फुलले !

आता मन मन मे मोदी…

या हल्ल्याची अद्याप कुठल्याही दहशतवादी गटाने जबाबदारी घेतलेली नाही. शिवाय या हल्ल्यामागील कारण देखील समजू शकलेले नाही. मुख्यमंत्री हाजी गुलबार खान यांनी हल्ल्याचा निषेध केला असून त्यांनी घटनेच्या सखोल चौकशीसाठी विशेष पथक तयार करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी २०१३ मध्ये काही दहशतवाद्यांनी गिलगिट बाल्टिस्तान मध्ये गिर्यारोहकांच्या कँपवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ९ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा