25 C
Mumbai
Monday, December 29, 2025
घरदेश दुनियाजी- २० साठी परदेशी पाहुणे राजधानीत अवतरले

जी- २० साठी परदेशी पाहुणे राजधानीत अवतरले

जगभरातून जवळपास ५०० नेते जी- २० परिषदेसाठी भारतात येणार

Google News Follow

Related

देशाच्या राजधानीच्या शहरात जी- २० शिखर परिषदेसाठी जगभरातील प्रमुख नेते येत आहेत. ९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर रोजी ही परिषद होणार असून या परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांनी शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळपासून येण्यास सुरुवात केली आहे. येणाऱ्या प्रत्येक नेत्याचे स्वागत भारतीय मंत्र्यांकडून भारतीय पद्धतीने केले जात आहे.

जवळपास ५०० नेते ऐतिहासिक अशा जी- २० शिखर परिषदेसाठी भारतात येत आहेत. याशिवाय त्यांचे शिष्टमंडळही असणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कार्यालयाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जागतिक नेत्यांच्या स्वागताची झलक व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.

जी- २० शिखर परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. ऋषी सुनक यांचे स्वागत केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी केलं. तसेच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे ही दिल्लीत दाखल झाले आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा शुक्रवारी दुपारी दिल्लीमध्ये दाखल झाले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येत आहेत.

हे ही वाचा :

चार वर्षात आर्थिक गुन्हेगारांकडून ११.८ अब्ज डॉलर्सची मालमत्ता जप्त

पारशी समुदायाचा उगम मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाईतला

देशभरातील उत्पादक जगभरातील नेत्यांना सांगणार ‘मिलेट्स’ची यशोगाथा

राज्यात गडगडाटासह पावसाचे जोरदार कमबॅक

भारतामध्ये आतापर्यंत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलेनी, आफिक्रन संघाचे प्रमुख अझली असायुमानी, युरोपीयन युनियनच्या अध्यक्ष व्रुसुला वोन डेर लायेन, अरजेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्ट फर्नाडझ, आयएमएफ प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा, युरोपियन कॉन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिचेल, डब्लूटीओ कार्यकारी प्रमुख नगोझी ओकनजो-इवेला, मॅक्सिकोच्या अर्थमंत्री रकेल बुईनरोस्ट्रो सानजेझ, ओईसीडी प्रमुख सचिव मॅथिस कोरमन हे दाखल झाले आहेत. त्यांचे भारतीय पद्धतीने विशेष स्वागत करण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा