34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरविशेषराज्यात गडगडाटासह पावसाचे जोरदार कमबॅक

राज्यात गडगडाटासह पावसाचे जोरदार कमबॅक

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा

Google News Follow

Related

गेले काही दिवस गायब झालेला पाऊस कालपासून पुन्हा अवतरला आहे. बहुतेक भागात यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्यात आणि मुंबईत सकाळ पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

भारतीय हवामान खात्याने राज्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा दिलेला आहे. मुंबई आणि पुन्हात पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही पाऊस जोरदार बॅटिग करत आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा आणि विदर्भात आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. पुढील ४८ तासात गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

 

 

मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. दरम्यान पुण्यातही अधूनमधून पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी तीव्र सरी कोसळतील असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. ठाणे परिसरातली पावसाचा जोर वाढलेला आहे. तसेच पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाने दमदार पुनरागमन केल्याने काहीसे शेतकरी सुखावले आहेत.

हेही वाचा :

चार वर्षात आर्थिक गुन्हेगारांकडून ११.८ अब्ज डॉलर्सची मालमत्ता जप्त

पारशी समुदायाचा उगम मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाईतला

देशभरातील उत्पादक जगभरातील नेत्यांना सांगणार ‘मिलेट्स’ची यशोगाथा

जी- २० साठी आलेल्या परदेशी पाहुण्यांना ASK G.I.T.A. देणार प्रश्नांची उत्तरे

अरबी समुद्राकडून येणारे पश्चिमी वारे तीव्र आहेत. यामुळे बऱ्याच जिल्ह्या ऑरेंज अलर्ट जारी केलेले आहेत. मुंबई, पुणे, कोकण, गोव्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात पुढील ४८ तासात पाऊस मुसळधार किंवा अतीमुसळधार पद्धतीने कोसळू शकतो. राज्यात वीजांचा कडकडात आणि मेघगर्जनासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

 

पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

 

ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली. साहजिकच ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने पावसाची तूट मोठ्या प्रमाणात होती. देशात गेल्या १० वर्षांमध्ये जे घडले नाही ते ऑगस्ट महिन्यात घडले. ऑगस्ट महिन्यात जो पाऊस पडला नाही त्याची भरपाई सप्टेंबर महिना करेल, दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्याची आशा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा