30.3 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरदेश दुनियानेपाळ: भाड्याच्या घरात राहतायेत माजी पंतप्रधान ओली!

नेपाळ: भाड्याच्या घरात राहतायेत माजी पंतप्रधान ओली!

नेपाळमधील बंडानंतर १० दिवसांत पहिल्यांदाच दिसले

Google News Follow

९ सप्टेंबर रोजी, नेपाळमधील जनरल-झेड निदर्शनांच्या दबावामुळे केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांच्या वादळात नेपाळी सरकार वाहून गेले. राजीनामा दिल्यानंतर दहा दिवसांनी, ओली पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या उपस्थित झाले.

नेपाळचे पदच्युत पंतप्रधान ओली १० दिवसांनी सार्वजनिकरित्या उपस्थित राहिले. गुरुवारी (१८ सप्टेंबर) त्यांना शिवपुरी लष्करी बॅरेक्समधून भक्तपूरला लष्कराच्या हेलिकॉप्टरने नेण्यात आले, जिथे त्यांच्यासाठी एक घर भाड्याने घेण्यात आले आहे.

८ आणि ९ सप्टेंबर रोजी जनरेशन-झी निदर्शनांनंतर ओली पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानातून लष्कराच्या हेलिकॉप्टरने निघाले. शिवपुरीतील लष्करी बॅरेकमध्ये ओली यांना सुरक्षित ठेवण्यात आले. त्यावेळी निदर्शकांनी काठमांडूमधील त्यांचे खाजगी घर, झापामधील त्यांचे वडिलोपार्जित घर आणि दमकमधील त्यांचे घर जाळून टाकले.  परिणामी, त्यांच्यासाठी दुसरे भाड्याचे घर शोधण्यात आले. त्यांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने त्याठिकाणी नेण्यात आले.

हे ही वाचा : 

“मी भारत आणि मोदी यांच्या खूप जवळ आहे”

मुंबईत आयफोन १७ च्या खरेदीवेळी तुफान गर्दी, हाणामारी!

फरार ललित मोदीच्या भावाला बलात्कार व ब्लॅकमेल प्रकरणात अटक!

मोदी इज द बॉस…

राजीनामा दिल्यानंतरच हेलिकॉप्टर येईल

९ सप्टेंबर रोजी काठमांडूच्या रस्त्यांवर तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या विरोधात जनक्षोभ उसळला होता. संतप्त निदर्शक थेट त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचले होते. या गोंधळात आत्मसंतुष्ट अवस्थेत असलेल्या ओली यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी नेपाळच्या लष्करप्रमुखांना फोन करून राजधानीतून हेलिकॉप्टरने पलायन करण्याची विनंती केली.

मात्र, लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांचा प्रतिसाद ठाम होता – “तुम्ही राजीनामा दिल्यानंतरच हेलिकॉप्टर पाठवले जाईल,” असे नेपाळी न्यूज पोर्टल ‘उकेरा’ने वृत्त दिले आहे. या अटी- शर्तीं आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहता ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सैन्याने परिस्थिती नियंत्रणात आणली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा