31 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरक्राईमनामाअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; २० मिनिटांसाठी होते तुरुंगात

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; २० मिनिटांसाठी होते तुरुंगात

निवडणूकीत फेरफार प्रकरणी अटक

Google News Follow

Related

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली होती. जॉर्जिया राज्यातून त्यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर २० मिनिटांत त्यांना दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला. २०२० साली झालेली अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचणे आणि फसवणूक असे गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

ट्रम्प यांच्यावर जॉर्जिया येथे निवडणूक निकाल बदलण्यासाठी फसवणूक, धमकी देणे आणि बनावटगिरी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आणखी १८ जणांना आरोपी करण्यात आले आहे. इतकेच नाही तर ट्रम्प यांचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज यांनी दखील आत्मसमर्पण केले आहे. १५ ऑगस्ट रोजी अटलांटा कोर्टाने आरोपपत्र सादर केले. आरोपपत्रात समाविष्ट ४१ आरोपांपैकी १३ आरोपांमध्ये ट्रम्प यांचे नाव आहे. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आणि नंतर जामीन मिळाला. सुटका झाल्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, “मी काही चुकीचे केले नाही.”

गेल्या पाच महिन्यांमधील हे चौथे प्रकरण आहे ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले.शिवाय गुन्हेगार म्हणून न्यायालयात हजर व्हावे लागले आहे. न्यायालयाने ट्रम्प यांना २५ ऑगस्टपर्यंत शरणागतीची मुदत दिली होती. डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी फुल्टन काउंटी तुरुंगात आले आणि त्यांनी शरणागती पत्करली. शरणागती पत्करल्यानंतर 20 मिनिटांसाठी ते तुरुंगात होते. या दरम्यान त्यांचा कैद्यासारखा फोटो देखील काढण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत हा फोटो देखील शेअर केला आहे.

हे ही वाचा:

… म्हणून जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवले

शरद पवार म्हणतात, अजित पवार आमचेचं

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत अल्लू अर्जुन, आलिया भट्ट सर्वोत्तम

तेजस विमानातून ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

डोनाल्ड ट्रम्प यांचे हे पहिले प्रकरण नसून या अगोदर देखील अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्यावर आरोप आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये त्यांनी शरणागती पत्करली आहे. असे असताना देखील २०१४ ला अमेरीकेत राष्ट्रध्यक्ष पदासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी त्यांची तयारी देखील सुरू झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा